Latest

Heat Weather Forecast | राज्यात पुढील दोन दिवस उष्मा वाढणार, IMD ची माहिती

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क : पुढचे दोन दिवस राज्यातील तापमान किंचित वाढणार आहे. त्यामुळे पुढचे २ ते ३ दिवस संपूर्ण महाराष्ट्रात उष्णता वाढण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान विभागाने आज (दि.०२) दिलेल्या बुलेटिनमध्ये दिली आहे. दरम्यान पुढच्या दोन दिवसांत कोकण आणि गोवा येथील तापमान देखील काही प्रमाणात वाढणार आहे. दरम्यान, येथील हवामान उष्ण आणि दमट राहणार आहे. तसेच विदर्भात देखील पुढील ३ दिवस कमाल तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढ होणार असल्याची शक्यता (Heat Weather Forecast) देखील हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ६ जूनपर्यंत राज्यातील काही जिल्ह्यात तुरळक पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामध्ये ४ जूनला विदर्भ वगळता संपूर्ण राज्यात तसेच ५ जूनला उत्तर कोकण वगळता राज्यात सर्वत्र तुरळक पावसाची शक्यता आहे. तर ६ जूनला दक्षिण कोकण किनारपट्टी, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि संपूर्ण विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडणार असल्याचे शक्यता (Heat Weather Forecast) हवामान विभागाकडून वर्तवली आहे.

काय आहे मान्सूनची सध्याची स्थिती?

सध्या देशभरात मान्सूनची चाहूल लागली आहे. दिवसेंदिवस मान्सूनची वाटचाल सुधारत आहे. दक्षिण अरबी समुद्र, मालदीव, लक्षद्वीपचा काही भाग, संपूर्ण कमोरीन क्षेत्रात, बंगालच्या उपसागराची काही भागात नैऋत्य मान्सून वारे सक्रिय असून, ते पुढे आगेकूच करत आहे. या भागात मान्सून सक्रियसदृष्य स्थिती निर्माण झाली असून, तो लवकरच अरबी समुद्रात दाखल होणार आहे. तसेच पुढील काही दिवसांत म्हणजे ८ जूनपर्यंत मान्सून केरळात दाखल होण्याची दाट शक्यता आहे. तर दरम्यान राज्यातील अनेक ठिकाणी उष्णता वाढणार (Heat Weather Forecast) असल्याची शक्यता देखील हवामान विभागाकडून वर्तवली आहे.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT