Latest

उष्णतेच्या लाटेमुळे विदर्भात हाहाकार ! चंद्रपूर, ब्रह्मपुरीमध्ये सूर्य तळपला

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : सोमवारी पुन्हा एकदा विदर्भात उष्णतेची लाट तीव्र झाली. चंद्रपूर 43.2, तर ब्रह्मपुरीचा पारा 43.1 अंशावर गेला होता. तसेच उत्तर महाराष्ट्रातील जळगाव 42.4, तर पुणे जिल्ह्यातील तळेगाव ढमढेरे गावचा पारा 42.2 अंशांवर गेला. विदर्भातील अवकाळी पावसाचे प्रमाण किंचित कमी होताच कमाल तापमानाने पुन्हा उसळी घेतली. विदर्भातील सर्वच शहरांचे तापमान 41अंशांवर गेले. मध्य महाराष्ट्रात पुणे व सोलापूर जिल्हा 40 अंशांवर, तर उत्तर महाराष्ट्रात जळगाव जिल्हा 42 अंशांवर गेला.

महाबळेश्वरही तापले..
संपूर्ण राज्याचा पारा वाढत असताना महाबळेश्वरही यंदा अपवाद राहिले नाही. येथे उन्हाळ्यात कमाल तापमानाचा पारा 25 ते 27 अंशांवर जातो. मात्र, यंदा प्रथमच तो सोमवारी 31.1 अंशांवर गेला. किमान तापमान 18.4 वर गेल्याने तेथेही उकाडा जाणवू लागला आहे.

राज्यातील प्रमुख शहरांचे तापमान
चंद्रपूर 43.2, ब्रह्मपुरी 43.1, अकोला 42.8, अमरावती 42, बुलडाणा 39, गोंदिया 42.8, नागपूर 40.9, वाशिम 41.1, वर्धा 42.5, यवतमाळ 41.5, छत्रपती संभाजीनगर 39.2, परभणी 41.9, नांदेड 39.8, बीड 40.6, मुंबई 32.2, अलिबाग 33.8, रत्नागिरी 34.1, डहाणू 33.4, पुणे 38.2, कोल्हापूर 37.7, सांगली 39.1, सातारा 37.4, सोलापूर 40.8, जळगाव 42.4, नाशिक 39.2.

SCROLL FOR NEXT