Latest

NEET PG exam : नीट-पीजी परीक्षा सहा ते आठ आठवडे लांबणीवर

दीपक दि. भांदिगरे

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा

'नीट-पीजी' 2021 चे (NEET PG exam ) कौन्सिलिंग आणि 'नीट-पीजी' 2022 च्या परीक्षा यांच्या तारखा एकाचवेळी आल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने 'नीट-पीजी' परीक्षा सहा ते आठ आठवडे लांबणीवर टाकली आहे. 'नीट-पीजी' परीक्षा 12 मार्च रोजी पार पडणार होती, मात्र सरकारच्या निर्णयामुळे ही परिक्षा आता एप्रिलपर्यंत पुढे ढकलली गेल्याचे स्पष्ट झाले आहे.

तारखांचा घोळ असल्याचे सांगत असंख्य विद्यार्थ्यांनी नीट-पीजी परीक्षा (NEET PG exam ) पुढे ढकलण्याची मागणी चालविली होती. या पार्श्वभूमीवर ही परीक्षा पुढे ढकलली जात असल्याचे आरोग्य सेवा खात्याच्या सचिवांनी आदेशात म्हटले आहे.

या मुद्यावर विद्यार्थ्यांनी सोशल मीडियात मोहिम चालवली होती तर काही विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिकादेखील दाखल केलेली आहे. परीक्षेच्या नवीन तारखा लवकरच जाहीर केल्या जातील, असेही आरोग्य मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

 हे ही वाचा :

SCROLL FOR NEXT