Latest

उन्हाळ्यात गुणकारी भोपळ्याची भाजी!

Arun Patil

नवी दिल्ली : भोपळा आणि अगदी त्याच्या बियाही आरोग्यासाठी गुणकारी असतात. विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसात भोपळ्याचे सेवन लाभदायक ठरते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. भोपळ्यापासून भाजी, घारगे, हलवा, खीर आणि रायताही बनवला जात असतो. हे पदार्थ चवीला जसे स्वादिष्ट असतात तसेच आरोग्यासाठीही गुणकारी असतात. भोपळ्यात व्हिटॅमिन बी, ए आणि अन्यही अनेक पोषक घटत आढळतात. शिवाय भोपळा हा थंड प्रकृतीचा असल्याने उन्हाळ्यात त्याचे सेवन लाभदायक ठरते.

भोपळ्यात 'क' जीवनसत्त्वही भरपूर असते. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. त्यामधील 'बीटा कॅरोटिन' हे अनेक आजारांपासून रक्षण करते. वजन कमी करण्यासाठीही भोपळा उपयुक्त ठरतो. त्यामध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असते व त्यामुळे दीर्घकाळ पोट भरल्यासारखे वाटते. भोपळ्यात कॅलरी कमी असल्यानेही वजन घटवण्यास मदत होते.

हृदयाचे आजार दूर ठेवण्यासाठीही भोपळा गुणकारी आहे. यामधील फायबर व पोटॅशियम रक्तदाबाला नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. भोपळ्यातील अँटिऑक्सीडंटस् शरीरातील कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवतात. त्यामुळे हार्ट अ‍ॅटॅकचा धोका कमी होतो. उन्हाळ्यात अनेक लोकांच्या शरीरातील पाणी कमी होते. अशा 'डिहायड्रेशन'च्या स्थितीत भोपळ्याचे सेवन लाभदायक ठरते. याचे कारण म्हणजे, भोपळ्यात 90 टक्के पाणी असते.

SCROLL FOR NEXT