Latest

रायगड : बहिणीशी बोलतो म्हणून खालापूरात मारहाण

अनुराधा कोरवी

खालापूर ः पुढारी वृत्तसेवा ; बहिणीचे लग्न ठरलेले असताना देखील तिच्याशी बोलणार्‍या एकाला जबर मारहाण करण्याची घटना खालापुरातील धामणी येथे घडली आहे.

अजय हिलम(रा.कर्जत) यांच्या बहिणीचे लग्न संदेश वाघमारे याचे सोबत ठरले आहे. असे असताना देखील आकाश बळीराम पवार हा अजयच्या बहिणीशी वारंवार बोलत असे. बहिणीशी यापुढे बोलायचे नाही. नाहीतर तुला धामणी येथे कंपनीचे गेट समोर येवुन मारू अशी धमकी दिली.

अजय याने आकाशला दिली होती. तरीसुद्धा आकाश ऐकत नसल्याने या रागातून अजय ,संदेश साहिल आणि त्यांचा अनोळखी मित्र (नाव गाव माहिती नाही) या चौघांनी रविवारी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास धामणे गावाच्या हद्दीत आशापुरा कंपनीचे गेटसमोर आकाशला गाठले .चौघांनी हातामधील दांडक्याने व लोखंडी रॉडने आकाशच्या डोक्यावर व पाठीवर मारहाण केली.याबाबत खालापूर पोलीस ठाणे येथे गश प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

SCROLL FOR NEXT