Latest

ब्रेकिंग : हाथरस प्रकरणातील दोषी आरोपी संदीप ठाकुरला जन्मठेपेची शिक्षा

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : उत्तर प्रदेशमधील बहुचर्चित हाथरस सामूहिक बलात्‍कार व हत्‍या प्रकरणातील दोषी आरोपी संदीप ठाकूर याला अनुसूचित जाती-जमाती न्‍यायालयाने आज ( दि. २ ) जन्‍मठेपेची शिक्षा ठोठावली. प्रकरणातील चार आरोर्पीपैकी संदीप ठाकूर याला दोषी ठरविण्‍यात आले होते. तर लवकुश सिंह, रामू हिंह आणि रवि सिंह यांची निर्दोष मुक्‍तता करण्‍यात आली होती.

उत्तर प्रदेशला हादरवणारे हाथरस प्रकरण

१४ सप्‍टेंबर २०२० रोजी उत्तर प्रदेशमधील हाथरसमधील चंदपा परिसरात एका युवतीवर बलात्‍कार करुन तिचा गळा आवळून खून करण्‍याचा प्रयत्‍न केला होता. २० सप्‍टेंबर २०२० रोजी दिल्‍ली सफदरजंग रुग्‍णालयात उपचार सुरु असताना पीडित युवतीचा मृत्‍यू झाला होता. युवतीने मृत्‍यूपूर्वी दिलेल्‍या जबाबच्‍या आधारे पोलिसांनी गावातीलच संदीप ठाकूर, लवकुश सिंह, रामू हिंह आणि रवि सिंह या चार आरोपींना अटक करण्‍यात आली होती.

सीबीआयने ६७ दिवसांमध्‍ये पूर्ण केला होता तपास

या गुन्ह्याने त्याच्या विवेकबुद्धीला धक्का बसला आहे, असे अलाहाबाद उच्च न्यायालयाने ऑक्टोबर 2020 मध्ये म्‍हटले होते. यानंतर दहा दिवसांनंतर हे प्रकरण केंद्रीय अन्वेषण विभागाकडे ( सीबीआय) वर्ग करण्यात आले, ६७ दिवसांमध्‍ये या प्रकरणाचा तपास पूर्ण केला होता. 2020 डिसेंबरमध्ये सीबीआयने चार आरोपींविरोधात अनुसूचित जाती-जमाती न्‍यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. चारही जणांवर सामूहिक बलात्कार आणि हत्येचा आरोप ठेवण्‍यात आला होता.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT