Latest

सहकार आणि पक्षीय राजकारण वेगळे : हसन मुश्रीफ

दिनेश चोरगे

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : सहकारी संस्था आणि पक्षीय राजकारण यात फरक आहे. बिद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीत आमच्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष विरोधात, तर भाजपचे जिल्हाध्यक्ष आमच्या सोबत होते. सहकारातील निवडणुका वेगळ्या असतात, असे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. ए. वाय. पाटील यांनी आपल्या विरोधात काम केल्याबद्दल त्यांचे पक्षाचे जिल्हाध्यक्षपद जाणार की राहणार, असे विचारले असता त्यांनी मौन पाळले.

के. पी. पाटील यांच्या हातामध्ये कारखाना सुरक्षित राहील, असा विश्वास सभासदांना वाटला असेल. त्यामुळे त्यांनी सत्तारूढ आघाडीला साथ दिली, असे सांगून मुश्रीफ यांनी वयाची पंचवीस वर्षे पूर्ण केलेल्या प्रत्येकाला विधानसभा निवडणूक लढविण्याचा अधिकार आहे. प्रत्येकजण ठरवून निवडणुकीत उतरत असतो. परंतु, प्रत्येकवेळी नशिब साथ देईलच असे नाही, असे एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले.

राज्य मागास आयोगाचे सदस्य राजीनामा देत आहेत. यासंदर्भात विचारले असता मुश्रीफ यांनी याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होईल, असे सांगितले. आरोपी ललित पाटील याला सहकार्य करणार्‍या ससूनमधील सर्वांना अटक केली आहे. दादा भुसे व तानाजी सावंत यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त करण्याचे काही कारण नाही. आरोप अजून सिद्ध झाले नाहीत. त्याला काही पुरावे नाहीत. अंदाजाने गोळ्या मारल्या जात असल्याचे मुश्रीफ यांनी आरोग्य विभागावर सध्या होत असलेल्या आरोपासंदर्भात विचारले असता स्पष्ट केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT