Latest

Haryana Jind Accident : हरियाणातील जिंद येथे बस-क्रुझरच्या धडकेत 8 ठार, 12 जखमी

backup backup

पुढारी ऑनलाइन डेस्क : Haryana Jind Accident : हरियाणाच्या जिंद येथे रोडवेज बस-क्रुझरची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात घडला. या घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला असून 12 जण जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ वैद्यकीय उपचारासाठी जिंद सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात जिंदमधील भिवानी रोडवरील बिबीपूर गावाजवळील एका मोठ्या रस्त्यावर घडला. आज शनिवारी सकाळी हा भीषण अपघात घडला.

घटनेची माहिती आजूबाजूच्या लोकांना समजताच सर्व लोकांनी आपापल्या वाहनातून जखमींना घेऊन सिव्हिल हॉस्पिटल गाठले. घटनेची माहिती मिळताच डीएसपी रोहतास धुळ पोलीस फौजफाट्यासह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. आणि जखमींना उपचारासाठी जिंद सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेचे गांभीर्य पाहून जिंद सामान्य रुग्णालयात जखमींवर उपचार करण्यासाठी इमर्जन्सी वॉर्डमध्ये अतिरिक्त डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. Haryana Accident

जिंद सामान्य रुग्णालयाचे डेप्युटी एमएस डॉ. राजेश भोला यांनी सांगितले की, अपघाताचे गांभीर्य लक्षात घेऊन डॉक्टरांना ड्युटीवर ठेवण्यात आले आहे. गंभीर रुग्णांवर उपचार सुरू असून, मृतांचे मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलच्या शवागारात ठेवण्यात आले आहेत. 6 मृतांची ओळख पटली आहे. तर दोघांची ओळख अद्याप पटलेली नाही. दैनिक जागरणने दिलेल्या माहितीनुसार मृतांची नावे खालीलप्रमाणे

Haryana Accident : मृतांची ओळख

1. रवी रा. धरमपाल रा. मदनखेडी वय 32 वर्षे

2. मनोज रा. सतबीर रा. मुंधल वय 45 वर्षे.

3. हरदीप रा. रामफळ रा. मुंधल वय 37 वर्षे.

४. सुखविंदर रा. रघुवीर मुंडल वय ३० वर्षे

5. बिमला वासी भाकलाना

6. संजय रा. शीशपाल रा. सिवेन

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT