Latest

Harsh Varrdhan Kapoor : अभिनव बिंद्राच्या बायोपिकसाठी हर्षवर्धनची मेहनत (Photos)

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : थारमधील आश्वासक कामगिरीनंतर, हर्षवर्धन कपूर (Harsh Varrdhan Kapoor) आता 'अभिनव बिंद्रा'च्या बायोपिकसाठी तयारी करत आहे. ज्यासाठी सर्व उत्सुक आहे. हर्ष पहिल्यांदाच वास्तविक जीवनातील व्यक्तिरेखा साकारणार आहे आणि त्याने त्याचा सोशल मीडिया पोस्ट मधून कळतंय. (Harsh Varrdhan Kapoor)

हर्षवर्धन कपूरने त्याच्या प्रॅक्टिस शूटिंगमधील काही क्षण कॅप्शनसह शेअर केले, "small steps everyday #abhinavbindra #abhinavbindrabiopic" अशी फोटो कॅप्शन सर्वांचे लक्ष वेधून घेणारी आहे.

पोस्टमध्ये त्याच्या नेमबाजीच्या सरावातील काही क्षण चित्रे आहेत. सराव करत ही भूमिका चोख पार पाडण्यासाठी हर्षची तयारी सुरू आहे. हर्षला अभिनवच्या भूमिकेत उत्सुकतेने पाहण्यासाठी चाहत्यांनीही कमेंट्समध्ये उत्साह व्यक्त केला आहे.

अलीकडे, हर्षवर्धनने इन्स्टाग्रामवर एक फोटो देखील शेअर केले होते जेथे तो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्याबद्दल अभ्यास करताना दिसतोय. त्याच्या तयारीची जोरदार झलक पाहता, चित्रपट कसा होणार आहे या साठी सगळे उत्सुक आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT