मुंबई; पुढारी ऑनलाईन
मुंबई इंडियन्सकडून रिलीज झालेला ( IPL 2022 ) हार्दिक पांड्या नव्या अहमदाबाद संघाचा कर्णधार होण्याची शक्यता आहे. मागील काही दिवसांच्या सुमार कामगिरीमुळे या वेळी मुंबई इंडियन्स हार्दिक रिटेन केले नाही. या पूर्वी अशा बातम्या येत होत्या की अहमदाबादची जबाबदारी दिल्ली कॅपिटल्सचा माजी कर्णधार आणि मुंबईचा श्रेयस अय्यरकडे सोपवण्यात येईल.
हार्दिक पांड्यावर अहमदाबादची मदार ( IPL 2022 )
एका इंग्रजी दैनिकच्या माहितीनुसार अहमदाबाद फ्रॅन्चाईजी वडोदराच्या अष्टपैलू हार्दिक पांड्याला आपल्या संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपवू शकतात. अहमदाबादचा संघ एका अर्थाने गुजरातचे प्रतिनिधित्व करणार आहे. तसेच त्यांचे होम ग्राऊंड तेथील नरेंद्र मोदी स्टेडियम असणार आहे. त्यामुळे संघाचे प्रतिनिधित्व हार्दिक पांड्याने करावे यासाठी अहमदाबाद फ्रॅन्चाईजी प्रयत्नशील आहेत.
राशिद खान होणार सहभागी ( IPL 2022 )
राशिद खान देखिल अहमदाबाद संघात सामिल होवू शकतो. फिरकीपटू राशिद खानला हैदराबाद सनरायजर्सकडे रिटेन व्हायचं होतं. पण संघाने फक्त केन विल्यमसनलाच झुकते मात देत त्याला रिटन केले. यानंतर अहमदाबाद संघाने राशिद खानला संघात घेण्याची तयारी केली आहे. जागतिक दर्जाचा उत्तम फिरकीपटूला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी अहमदाबादचा संघ प्रयत्नशील आहे.
इंडियन प्रीमियर लीग यंदाच्या हंगामात १० संघाचा समावेश होणार आहे. मागील महिन्यात जुन्या संघानी त्याना कायम ठेवायचे आहे अशा चार खेळाडूंच्या नावांची यादी आयपीएलच्या प्रबंधकांकडे सोपवली आहे. आता अहमदाबाद आणि लखनऊ या नव्या दोन संघांनी त्यांना हव्या असणाऱ्या खेळाडूंची यादी या महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत प्रबंधकांकडे पाठवायची आहे.
ऑक्शनकडे लक्ष ( IPL 2022 )
यंदा आयपीएलचा सर्वात मोठा ऑक्शन ( लिलाव ) होणार आहे. दोन नव्या संघांच्या समावेशामुळे यावेळी खेळाडुंच्या खरेदीसाठी मोठी चढाओढ दिसणार आहे. तसेच या स्पर्धेचा फायदा खेळाडुंना अधिक मिळण्याची शक्यता आहे. काही संघांनी आपल्याला हव्या असणाऱ्या खेळाडुंशी चर्चा देखिल करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे ७ व ८ फेब्रुवारी रोजी चेन्नई येथे होणाऱ्या ऑक्शनकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.