पुढारी ऑनलाईन डेस्क : आजपासून नवीन वर्ष सुरू झाले आहे. आज वर्षाचा पहिला दिवस आहे. देशभरात जल्लोषाचे वातावरण असून लोक एकमेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील देशवासीयांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. "सर्वांना २०२४ या नववर्षाच्या शुभेच्छा! हे वर्ष सर्वांना समृद्धी, शांती आणि अद्भूत आरोग्याचे जावो," असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.
आसमंत उजळून टाकणारी नेत्रदीपक आतषबाजी, संगीताच्या तालावर ठेका धरत थिरकणाऱ्या पावलांनी बेभानपणे नृत्य करत देशवासियांनी रविवारी रात्री सरत्या वर्षाला निरोप देत नववर्षाचे जल्लोषी स्वागत केले. लोकांनी फटाके फोडून २०२४ चे स्वागत केले. यासह २०२३ ला निरोप दिला. आज महाकाल, वैष्णो देवी, गंगा घाट, सुवर्ण मंदिरासह देशातील सर्व प्रार्थनास्थळांमध्ये वर्षातील पहिली आरती आणि पूजा करण्यात आली.