पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रसिध्द अभिनेते कमल हसनचा जन्म ७ नोव्हेंबर १९५४ रोजी तामिळनाडूतील परमकुडी येथे झाला. त्यांचे वडील श्रीनिवास हे वकील होते. तर आई राजलक्ष्मी ही गृहिणी होती. भाऊ चारु हरान हाही अभिनेता होता. बहिण नलिनी शास्त्रीय नृत्यांगणा होती. अशा कलासक्त कुटुंबात त्यांचा जन्म झाला. एक महानायक म्हणून कमल हासन यांनी जितकी प्रसिध्दी मिळवली, (Kamal Haasan Birthday) तितकीच त्यांचे वैयक्तिक आयुष्य चर्चेत राहिले होते. एखाद्या चित्रपटाची कहाणी शोभेल, असं कमल हासन यांचं जीवन आहे. (Kamal Haasan Birthday)
कमल यांच्यावर बालपणापासूनच कलेचे संस्कार झाले. बालपणी शिक्षणातही हुशार असल्याने त्यांच्या मोठ्या भावाने कमल यांनी उच्च शिक्षण घेण्याचा आग्रह धरला. कमल यांनी मद्रास येथे उच्च शिक्षण घेतले. (Kamal Haasan Birthday)
अभिनयात असलेली आवड पाहून कमल यांच्या वडिलांनी त्यांना चित्रपट आणि नाटकामध्ये काम करण्यास प्रोत्साहन दिले. पहिल्यांदा कमल यांनी काही चित्रपटांमध्ये दुय्यम भूमिका केल्या. तथापि, नंतरची ७ वर्षे ते चित्रपटापासून दूर राहिले.
१९७० मध्ये कमल यांनी पुन्हा एकदा प्रवेश केला. 'मानवन' या चित्रपटात त्यांना पहिली महत्त्वाची भूमिका मिळाली. तथापि, ती भूमिका नृत्याशी संबंधित होती. १९७३ ते ७५ या काळात त्यांनी सहाय्यक भूमिका करण्यातचं समाधान मानले. 'अवलोरु थोडरकथाई' आणि 'नानअवनीलाई' या चित्रपटात त्यांना रजनीकांत यांच्याबरोबर भूमिका करण्याची संधी मिळाली.
१९७५ नंतर त्यांचा अभिनय खर्या अर्थाने बहरला. त्यानंतरच्या १० वर्षांत त्यांनी १००हून अधिक चित्रपटात भूमिका केल्या. 'मनमधा लिलाई,' 'उधापू कानसिमितूगिरधू' यातील त्यांचा अभिनय चांगला गाजला. या भूमिकेसाठी त्यांना सलग दुसर्या वर्षी तामिळ फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. या काळात त्यांनी 'मुंद्रू मुदिचू' या नाटकातही भूमिका गाजवली. १९७८ मध्ये तेलगू चित्रपट सोमोकादिधी सोक्कादिधी या चित्रपटातील त्याची दुहेरी भूमिका संस्मरणीय ठरली.
१९८० मध्ये त्यांचा हिंदी चित्रपसृष्टीत प्रवेश झाला. 'एक दुजे के लिये' या चित्रपटातल्या त्यांच्या अभिनयाने सिनेरसिकांना अक्षरश: वेड लावलं. हिंदीबरोबरच त्यांनी तेलगु आणि तमिळ चित्रपटही सुरूच ठेवले होते. १९८१ मध्ये 'राजा पारवई' या चित्रपटातून त्यांनी अभिनयाचे शतक साजरे केले. याच चित्रपटातून त्यांची निर्माता म्हणून ओळख निर्माण झाली. त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून सलग तीनदा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. १९८४ नंतर त्यांनी 'सागर,' 'विक्रग,' 'स्वाती मुथियम,' 'राजतिलक' आदी चित्रपटात प्रुमख भूमिका केल्या. आंध्र प्रदेशातही त्यांच्या चित्रपटांना लोकप्रियता मिळाली. नंतर त्यांच्या अनेक चित्रपटांचे तेलगू रिमेक करण्यात आले. 'पुनागायीमनन' या चार्ली चॅप्लीनच्या चित्रपटावर आधारित तामिळ चित्रपटातील त्यांचा डबल रोल चांगलाच गाजला. मणिरत्नम यांच्या 'नायकन' या (१९८७) चित्रपटातलीही भूमिका फार गाजली. या चित्रपटासाठी त्यांना दुसरा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. 'पुष्पक' या चित्रपटातील (१९८८) त्यांची मूक भूमिका आजही सिनेरसिकांच्या स्मरणार्थ आहे. एक विनोदी अभिनेता अशी ख्यातीही कमल हसन यांना याच कालावधीत मिळाली.
एका चित्रपटासाठी दीड कोटी रूपये मानधन मिळवणारा कमल हासन हे भारतातील त्यावेळचे अभिनेते ठरले होते. १९९४ च्या दरम्यानच्या चित्रपटासाठी त्यांनी इतके मानधन घेतले होते. यापूर्वी १९७० ते १९८७ या कालावधीत सर्वात अधिक मानधन घेणारे राजेश खन्ना होते.
कमल हासन यांचा 'चाची ४२०' हा त्यांचा स्त्री भूमिका असलेला चित्रपट आपल्याला माहिती आहे. परंतु, विनोदी चित्रपट 'अव्वई शनमुगई'मध्येही त्यांनी स्त्री भूमिका साकारली होती. याच चित्रपटाचा हिंदी रिमेक म्हणजे-'चाची ४२०.'
१९७५ मध्ये 'अपूर्वा रंगनागल' मध्ये मुख्य अभिनेता म्हणून कमल हासन यांना भूमिका मिळाली. या चित्रपटातून सिनेजगतात त्यांना ओळख मिळाली. १९७७ मध्ये '१६ भयानिथानिले' चित्रपट केला. हा चित्रपट सुपरहिट ठरला. कमल हासन स्टार बनले. चित्रपटामध्ये रजनीकांत आणि श्रीदेवी यांच्यासोबत त्यांनी काम केलं. १९८१ मध्ये हासन यांना पहिल्यांदा हिंदी चित्रपट 'एक दूजे के लिए'मध्ये काम करण्याची संधी मिळाली. चित्रपट सुपरहिट झाला. आणि हासन हिंदी सिनेसृष्टीचा आणखी एक नवा लोकप्रिय चेहरा बनला. त्यांनी 'सदमा', 'सागर', 'गिरफ्तार' यासारखे हिंदी चित्रपट केले.
कमल हसन यांचे सात चित्रपट ऑस्करसाठी नॉमिनेट झाली होती. हे चित्रपट- सागर, स्वाति मुत्यम, नयागान, थेवर मगन, कुरूथीपुनाल, इंडियन आणि हे राम असे आहेत.
'हे राम' या चित्रपटाचे दिग्दर्शन कमल हासन यांनी केले होते. मध्यंतरीच्या काळात त्यांनी 'विरूमानदी' हा चित्रपट केला. त्याचबरोबर 'अनभेशिवम,' 'वसूल राजा एमबीबीएस' असे हिट चित्रपट दिले. 'वसूल राजा एमबीबीएस' हा 'मुन्नाभाई एमबीबीएस' या हिंदी चित्रपटाचा रिमेक होता. २०१० नंतर त्यांनी 'विश्वरूपम' हा चित्रपट केला होता. त्यामुळे बराच वाद निर्माण झाला होता.
रिपोर्टनुसार, कमल हासन यांनी जितके चित्रपट गाजवले. तेवढीच त्यांच्या वैयक्तिक आयुष्याचीही चर्चा झाली आहे. कमल हासन यांच्या आयुष्यात अनेकवेळा प्रेम आले; पण ते फार काळ टिकले नाही. रिपोर्टनुसार, सारिकाशिवाय गौतमी तडीमल्लाही त्यांच्या आयुष्यात आली होती, पण तिच्यासोबतचं नातं १३ वर्षांत तुटल्याचं म्हटलं जातं.
कमल यांनी १९७८ मध्ये वाणी गणपतीशी विवाह केला होता. वाणी वयाने मोठा होती. पण, त्यांचा संसार टिकला नाही. अखेर दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. वाणीशी वेगळे होण्याचं कारणं सारिका होती. कमल हासन यांच्या आयुष्यात देखील सारिकाची एंट्री झाली. त्याचवेळी कमल हे वीणापासून वेगळे झाले. २००२ मध्ये कमल हासन यांनी सारिकाशीही घटस्फोट घेतला.