Latest

Happy B’day Dhanush : साई पल्लवी ते राशी खन्नापर्यंत साऊथच्या अभिनेत्रींना धनुषची का आहे भूरळ?

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : साऊथ स्टार धनुषचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. (Happy B'day Dhanush) दक्षिणेत तर धनुषला प्रेक्षक चाहत्यांना अक्षरश: डोक्यावर उचलून घेतलं आहे. केवळ चाहतेच नाही तर त्याच्यासोबत अभिनय करणाऱ्या महिला सहकलाकार अभिनेत्रींनाहीदेखील त्याची भूरळ आहे. मग ती साई पल्लवी असो वा राशी खन्ना. धनुष किती मेहनती अभिनेता आहे, हे अभिनेत्री भरभरून सांगत असतात. तो सेटवर किती उत्साहाने, जोशपूर्ण काम करतो, आपल्या कामाबाबत किती गंभीर आणि दक्ष असतो, अनेक कौतुकाचे गोडवे अभिनेत्री गात असतात. (Happy B'day Dhanush)

असूर असो वा बॉलिवूडपट 'रांझना' मनाला भिडणारे चित्रपट देण्यात धनुषचा हातखंडा आहे. चित्रपटांतील भावस्पर्शी कथानकामुळे धनुषच्या अभिनयाला जोड मिळते. अनेकजण म्हणतात की, धनुष दिसायला खास नाही. म्हणून तो डल दिसणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीत बसतो. पण, साऊथच्या प्रेक्षकाला दिसण्याशी काही संबंध नाही. कारण, धनुषकडे सुंदर दात आणि मनमोहक हास्य आहे. या द्वयींवर तो आपल्या व्यक्तीमत्त्वाचा सर्वांवर प्रभाव टाकतो.

एक प्रतिभावान, कष्टाळू अभिनेता जर प्रेक्षकांच्या समोर असेल तर त्यांना कशाचीच परवा नसते की, तो कसा दिसतो? काही चाहते तर म्हणतात की, त्याचे चित्रपट हिट होणार की नाही हे मला माहिती नसते, पण फक्त त्याच्यासाठी मी त्याचे सिनेमे पाहतो. कारण त्याचे कौशल्य आणि भव्य हास्यासमोर सर्व गोष्टी मागे पडतात. सुंदर तो आहे, जो सुंदर काम करतो. आणखी काही चाहते म्हणतात की, त्याचा चेहरा आकर्षक आहे, नाक, डोळे रेखीव आहेत. तो बॉलिवूडच्या नायकांच्या तुलनेत देखणा दिसतो. त्याच्या गडद कायामुळे तो आणखी उठावदार दिसतो.

वास्तवात, अभिनेत्याचे दिसणे तितकं महत्त्वाचे ठरत नाही. कारण, अगदीच सावळे आणि दिसायलाही फार सुंदर नसलेले अभिनेते प्रेक्षकांनी स्वीकारलेले आहेतच की! मुळात त्याच्याकडे अभिनय कौशल्य किती आहे, हे प्रेक्षक पाहतात. मग इतर गोष्टी गौण ठरतात.
धनुषने अन्य अभिनेत्यांप्रमाणे शरीरयष्टी बनवलेली नाही. तो मुळात जसा दिसतो, तसाच पडद्यावरही दिसतो. दक्षिणेत धनुष एक महान रोल मॉडल आहे. तो सुपरस्टार असूनही कोणत्याही महागड्या वस्तू वापरताना दिसत नाही. कपड्यांचेच उदाहरण घ्या. तो नेहमीच कॅज्युअल लूकमध्ये दिसतो.

असं म्हटलं जातं की, तो शाकाहारी आहे. त्याला फुटबॉल खेळणं खूप आ‍वडतं. कमी वयात राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारा धनुषच आहे. अभिनेता गायक, आणि चित्रपट निर्माता म्हणून त्याने चित्रपटसृष्टीत आपली छाप सोडलीय. 'व्हाय धीस कोलावेरी डी' या गाण्याला आवाज दिल्यानंतर धनुष प्रकाशझोतात आला होता.

करिअरच्या सुरुवातीला धनुषला पाहून अनेकांनी त्यांची खिल्ली उडवली. सडपातळ, दिसायला गडद आणि त्याच्या चेहऱ्यावर काहींनी हसत टीका केली. पण त्याने काही व्यावसायिक चित्रपट केले. यामध्ये 'सुलान' चित्रपटाचे उदाहरण घेता येईल जे, २००४ मध्ये प्रदर्शित झाला होता. त्याला मिळालेल्या यशानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. 'पोलाधवन,' 'पदिकथवन,' 'राऊडी बेबी,' 'अदुकलाम,' 'वाडा चेन्नई,' 'असुरन,' 'थिरूविलेयादल आरंबम,' 'कॅप्टन मिलर,' 'काधाल कोंडेन' चित्रपटांनी त्याला मोठं केलं. राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर त्याची गणना सर्वोत्तम अभिनेत्यांमध्ये होऊ लागली. ५८ व्या आणि ६७ व्या राष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये सर्वोत्तम अभिनेता हा पुरस्कार मिळाला. धनुषने आनंद एल. राय दिग्दर्शित 'रांझना' चित्रपटाद्वारे हिंदी सृष्टीमध्ये पदार्पण केले. बॉलिवूडमध्ये त्याला फारसे यश मिळाले नसले तरी दाक्षिणात्य प्रेक्षकांसाठी मात्र तो 'सिनेमाचा सर्वस्वी हिरो'चं आहे.

(photos-dhanush_fc___, dhanush___fan__page insta वरून साभार )

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT