Latest

Israel-Hamas War : उत्तर गाझात हमास संपुष्टाकडे

Arun Patil

तेल अवीव, वृत्तसंस्था : उत्तर गाझामधील हमासची ताकद आता संपुष्टाकडे आहे. या भागात हमासचा संपूर्ण खात्मा होण्याच्या मार्गावर आहे. अगदी थोडा काळ आता त्यासाठी लागेल, असा दावा इस्रायली लष्कराने केला आहे. जबलिया आणि शेजैया भागातील हमास बटालियन नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. इस्रायली लष्कराने हमासला चारही बाजूंनी घेरले आहे. हमासच्या हजारावर सैनिकांनी शरणागती पत्करली आहे, असे इस्रायलचे संरक्षण मंत्री योव गॅलंट यांनी सांगितले.

महिनाभरात हमासच्या 500 सैनिकांना अटक करण्यात आली आहे. 1 डिसेंबर रोजी युद्धविराम संपुष्टात आला. तेव्हापासून ते आजपावेतो हमासच्या 140 सैनिकांना ताब्यात घेण्यात आले. ते शाळा, निवारागृहे आणि रहिवासी इमारतींमध्ये लपून बसलेले होते. अटकेतील 350 हमासचे सैनिक तर उर्वरित पॅलेस्टिनी इस्लामिक जिहाद या संघटनेचे दहशतवादी आहेत, अशी माहितीही इस्रायलकडून देण्यात आली.

SCROLL FOR NEXT