Latest

ज्ञानवापी सर्वेक्षण अहवाल चार आठवडे सार्वजनिक होणार नाही : न्यायालयाने स्‍वीकारला ‘एएसआय’

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : ज्ञानवापी संकुलाशी सीलबंद सर्वेक्षण अहवाल ४ आठवड्यांपर्यंत सार्वजनिक करू नये, अशी विनंती भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने ( 'एएसआय') न्‍यायालयाने होती. वाराणसीचे जिल्हा न्यायाधीश डॉ. अजय कृष्ण विश्वेश यांनी 'एएसआय'चा विनंती अर्ज स्वीकारला आहे. त्‍यामुळे आता पुढील चार आठवडे ज्ञानवापी सर्वेक्षण अहवाल सार्वजनिक होणार नाही, हे स्‍पष्‍ट झाले आहे. Gyanvapi Survey Report

भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने ज्ञानवापीचा पाहणी अहवाल दोन सीलबंद लिफाफ्यांमध्ये जिल्हा न्यायाधीश डॉ. अजय कृष्ण विश्वेश यांच्या न्यायालयात दाखल केला आहे. अहवालाची मागणी केवळ हिंदूच नाही तर मुस्लिम बाजूनेही केली आहे. हिंदू पक्षाने अहवालाची प्रत त्वरित देण्याची विनंती केली होती. मुस्लिम पक्षाने आधी आक्षेप घेतला, नंतर ईमेल आयडी देऊन अहवाल मागवला. Gyanvapi Survey Report

अंजुमन इंतेजामिया मस्जिद कमिटीने जिल्हा न्यायाधीशांच्या न्यायालयात आक्षेप नोंदवला आहे. प्रतिज्ञापत्र घेऊनच सर्वेक्षण अहवाल द्यावा, अशी विनंती समितीने केली. सर्वेक्षण अहवाल लीक होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. मीडिया कव्हरेजवर बंदी घालण्याची मागणीही करण्यात आली आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT