Latest

ज्ञानवापी खटला सुनावणीस याेग्‍य की अयाेग्‍य, यावर आता ३० मे राेजी सुनावणी

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क :

ज्ञानवापी खटला सुनावणीस योग्‍य आहे की अयाेग्‍य ? यावर आज वाराणसी जिल्‍हा न्‍यायाधीश डॉ. अजय कुमार विश्‍वेष यांच्‍या न्‍यायालयात सुनावणी झाली. अंजुमन इंतजामिया मसाजिद समितीने हा खटला चालविण्‍यास योग्‍यच नाही, असा दावा केला आहे. न्‍यायालयात सर्वप्रथम मुस्‍लिम पक्षाच्‍या प्रतिज्ञापत्रावर सुनावणी झाली. दाेन्‍ही पक्षांनी युक्‍तीवाद केला.  यानंतर न्‍यायालयाने ३० मे राेजी पुढील सुनावणी हाेईल, असे स्‍पष्‍ट केले.

१९९१ च्‍या प्रार्थना स्‍थळ अधिनियमावर सर्वप्रथम सुनावणी व्‍हावी, अशी मागणी मुस्‍लिम पक्षाच्‍य वतीने करण्‍यात आली आहे. यावर आज सुनावणी झाली. दाेन्‍ही पक्षकारांचा युक्‍तीवाद झाल्‍यानंतर यावरील निर्णय ३० मे राेजी हाेईल, असे वाराणसी जिल्‍हा न्‍यायाधीश डॉ. अजय कुमार विश्‍वेष यांनी स्‍पष्‍ट केले.

SCROLL FOR NEXT