Latest

Gujarat Election Results 2022 LIVE | गुजरातमध्ये भाजप ऐतिहासिक विजयाच्या मार्गावर, १५० जागांवर विजय

दीपक दि. भांदिगरे

Gujarat Election Result 2022 : गुजरातमधील विधानसभा निवडणुकीत भाजपची ऐतिहासिक विजयाकडे घोडदौड कायम आहे. मतदानाच्या पाच फेऱ्यांनंतर भाजप १५० जागांवर विजयी झाला आहे. तर काँग्रेस १९ जागांवरील आघाडीसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर आम आदमी पक्ष ६ जागांवर आघाडीवर आहे. पाटीदार समाजाचे नेते आणि भाजपचे उमेदवार हार्दिक पटेल ६१ हजार मतांनी आघाडीवर आहेत. गुजरातचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार भुपेंद्र पटेल यांनी मोठा विजय मिळवला आहे. गुजरात विधानसभेच्या निवडणुकीत भाजपचा हा मोठा विजय आहे.

निवडणूक आयोगाच्या १२ वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार भाजपला आतापर्यंत ५३ टक्के मते मिळाली आहेत, तर काँग्रेसला २७ टक्के आणि आपला १३ टक्के मते मिळाली आहेत. १९९५ पासून गुजरातमध्ये भाजपला कोणी हरवू शकलेला नाही. २०१७ मध्ये भाजपने ९९ जागा जिंकल्या होत्या, तर काँग्रेसला ७७ जागा मिळाल्या होत्या. पण यावेळी काँग्रेसला मोठा धक्का देत भाजपने विक्रमी बहुमताकडे वाटचाल केली आहे.

पेटलाडमधून भाजप विजयी, २० वर्षांनंतर काँग्रेसच्या हातातून जागा निसटली

आनंद जिल्ह्यातील पेटलाड विधानसभा मतदारसंघातून भाजपचे कमलेश पटेल (मास्टर) विजयी झाले आहेत. पेटलाड ही काँग्रेससाठी सर्वात सुरक्षित जागा मानली जात होती, पण काँग्रेसने सहावेळा जिंकून आलेले विद्यमान आमदार निरंजन पटेल यांना डावलून डॉ. प्रकाश परमार यांना उमेदवारी दिली होती. हा निर्णय काँग्रेससाठी धोक्याचा ठरला आहे.
(Gujarat Election Result 2022)

Gujarat Election Result 2022 LIVE Updates

  • पेटलाडमधून भाजप विजयी, २० वर्षांनंतर काँग्रेसच्या हातातून जागा निसटली
  • भाजपचे उमेदवार पटेल मुकेशकुमार डी. ३ हजार मतांनी आघाडीवर.
  • भाजप १५४ जागांवर तर काँग्रेस १७ जागांवर आघाडीवर आहे
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी ६ वाजता भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत.
  • गांधीनगर दक्षिण मतदारसंघातून भाजप नेते अल्पेश ठाकोर ३,२७० मतांनी आघाडीवर.
    द्वारकामध्ये भाजपचे उमेदवार पबुभा वीरंभ मानेक ९ हजार मतांनी आघाडीवर.
  • गुजरातमध्ये भाजप ऐतिहासिक विजयाच्या मार्गावर, १४४ जागांवर आघाडीवर
  • गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी घाटलोडियाच्या शहरी मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा विजयांच्या दिशेने वाटचाल केली आहे. मतमोजणीच्या पाच फेऱ्यांनंतर त्यांनी प्रतिस्पर्ध्यावर जवळपास २० हजार मतांची आघाडी घेतली.
  • भाजपची १५६ जागांवर विक्रमी आघाडी, काॅंग्रेस मागे तर आपची ८ जागांवर मुसंडी
  • हार्दिक पटेल यांनी आपचे उमेदवार अमरसिंह ठाकोर यांना मागे टाकून काही मतांची आघाडी घेतली
  • भाजपने गुजरातमध्ये विक्रमी आघाडी घेतली असून 152 जागांवर भाजप आघाडीवर आहे.
  • खंभलिया निवडणूक लाइव्ह अपडेट: आपचे नेते इसुदान गढवी 3215 मतांनी पुढे आहेत 
  • गुजरात विधानसभा निवडणुकीच्या सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये द्वारका जिल्ह्यातील खंभलिया विधानसभा मतदारसंघातून आम आदमी पक्षाचे नेते आणि मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार इसुदान गढवी पुढे आले आहेत. मतमोजणीच्या 2 फेऱ्यांनंतर इसुदान गढवी 3215 मतांनी आघाडीवर आहेत.
  • घाटलोडिया चुनाव निकाल LIVE: मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल १३ हजार मतांनी आघाडीवर
  • गुजरात विधानसभा चुनाव निकाल लाईव्हमध्ये भारतीय जनता पक्षाला (भाजप) बहुमत मिळाले आहे. सीएम भूपेंद्र पटेल (भूपेंद्रभाई पटेल) दुसऱ्या फेरीअखेर 13000 मतांनी आघाडीवर आहेत.
  • जामनगर उत्तरमधून रिवाबा जडेजा पुढे आहे गुजरात विधानसभा चुनाव निकाल लाइव्हमध्ये, रिवाबा जडेजा जामनगर उत्तर मतदारसंघातून आघाडीवर आहेत. रिवाबा भारतीय क्रिकेटर रवींद्र जडेजाची पत्नी आहे.
  • 'आप'चे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार इसुदान गढवी खंबालियामधून आघाडीवर आहेत
  • गुजरातमध्ये भाजपने आघाडी घेतली आहे. भाजप १३२ जागांवर तर काँग्रेस ४० जागांवर आघाडीवर आहे.

गुजरातमध्ये भाजप विक्रम मोडणार- पूर्णेश मोदी 

गुजरातमध्ये भाजप विक्रम मोडणार आहे. पक्षाला जास्तीत जास्त जागा आणि सर्वाधिक मतदानाची टक्केवारी मिळेल. आमचे सर्व उमेदवार त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवारांपेक्षा मोठ्या फरकाने विजयी होतील. भाजपचा मोठा विजय होईल- सुरत पश्चिम येथील भाजपचे उमेदवार पूर्णेश मोदी 

  • भाजपचे सीके राऊलजी हे आपचे राजेश पटेल राजू आणि काँग्रेसच्या रश्मिताबेन दुष्यंतसिंह चौहान यांच्या विरोधात आघाडीवर आहेत.
  • गुजरातमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपने पार केला बहुमताचा आकडा
  • गुजरातमध्ये सुरुवातीच्या कलांमघ्ये भाजप १२४ जागांवर आघाडीवर, काॅंग्रेस ५० जागांवर आघाडीवर

विरमगाममधून भाजपचे हार्दिक पटेल पिछाडीवर….

– मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आघाडीवर आहेत

– स्ट्राँग रूम उघडल्या. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात

भाजपला १३५-१४५ जागा मिळतील -हार्दिक पटेल

विकासाच्या जोरावर गुजरातमध्ये सरकार स्थापन होत आहे. गेल्या २० वर्षांत येथे एकही दंगल आणि दहशतवादी हल्ला झालेला नाही. लोकांना माहित आहे की भाजपने त्यांच्या अपेक्षा पूर्ण केल्या आहेत. ते 'कमळ' चिन्हावर बटण दाबतात. कारण भाजपमध्ये त्यांचे भविष्य सुरक्षित आहे असा त्यांचा विश्वास आहे. भाजपने प्रशासन दिले आहे आणि हाच विश्वास मजबूत केला, अशी प्रतिक्रिया भाजप उमेदवार हार्दिक पटेल यांनी व्यक्त केली आहे. १३५-१४५ जागा मिळवून आम्ही निश्चितपणे सरकार स्थापन करणार आहोत. तुम्हाला काही शंका आहे का?, असेही त्यांनी म्हटले आहे. हार्दिक पटेल हे विरमगाममधील भाजपचे उमेदवार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.