Latest

गुजरातमध्ये एकाच वेळी १५० ठिकाणी छापे; राज्य एटीएस, जीएसटीची संयुक्त कारवाई

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन: गुजरात एटीएस आणि जीएसटीने संयुक्त कारवाई करत गुजरातमधील १५० ठिकाणी छापे टाकले आहेत. यामध्ये गुजरातमधील सुरत, अहमदाबाद, जामनगर, भरूच आणि भावनगर या जिल्ह्यातील महत्त्वाच्या १५० ठिकाणी छापे टाकले असल्याचे समजते. या कारवाईत आंतरराष्ट्रीय मार्गांवर होणारी करचोरी आणि मनी ट्रेलची चौकशी केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

गुजरातमध्ये पुढील महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी हा छापा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. १८२ जागांच्या गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. यानंतर गुजरातमध्ये निवडणुकीचे वातावरण निर्मिती झाल्याचेही पाहायला मिळत आहे.

विधानसभा निवडणूकीपूर्वी राज्यात अनेक कारवाया

गुजरात विधानसभा निवडणूकीपूर्वी सुरक्षा यंत्रणांनी गुजरातेत कारवाई करत, ७१ कोटी ८८ लाखांची विक्रमी रक्कम वसूल केली आहे. निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार सुरक्षा यंत्रणांकडून राज्यात विशेष मोहिम राबवली जात आहे. गुजरातमध्ये निवडणूका जाहिर झाल्यापासून काही दिवसातच ७१.८८ कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीचे आयोजन कालावधीत २७.२१ कोटी रुपयांच्या झालेल्या वसुलीच्या तुलनेत ही रक्कम खूपच जास्त आहे.

या कारवाईप्रकरणी गुजरातमधील मुंद्रा बंदरात चुकीच्या घोषणा करत आयात केलेला माल लपवून ठेवला जात असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. अशाप्रकारे बंदरात होणाऱ्या तस्करी कारवाईतून ६४ कोटी रूपयांची खेळणी आणि वस्तू मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आले आहे. तसेच याप्रकरणी दोन व्यक्तींना देखील अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू असल्याचे तपास यंत्रनेने सांगितले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT