Latest

१९९३ मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी गुजरात ATS ची मोठी कारवाई, चारजणांना अटक

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क

गुजरात एटीएसने १९९३ च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील चार आरोपींना अटक केली. याबाबतचे वृत्त ANI ने दिले आहे. १९९३ मध्ये मुंबईत साखळी बॉम्बस्फोट घडवण्यात आले होते. या बॉम्बस्फोटात २५७ नागरिकांचा मृत्यू झाला होता. तर यात ७१३ जखमी झाले होते.

मुंबईतील बॉम्बस्फोटानंतर संशयितांनी परदेशात पलायन केले होते. पण त्यानंतर बनावट पासपोर्टवर ते अहमदाबाद येथे आले होते. एटीएसला अबू बकर, युसूफ भटाका, शोएब बाबा, सैयद कुरैशी यांना पकडण्यात आले आहे. हे चारजण गुप्तचर यंत्रणांची दिशाभूल करण्यासाठी नेहमी आपला ठावठिकाणा बदलत होते. पण गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर त्यांना पकडण्यात आले आहे.

मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी गेल्या तीन दशकांमध्ये अनेक आरोपींना अटक होऊन शिक्षा झाली. मात्र, दोन मुख्य आरोपी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि टायगर मेमन अजून सापडलेले नाहीत.

SCROLL FOR NEXT