Latest

एप्रिलमध्ये जीएसटी संकलनात विक्रमी वाढ; प्रथमच ओलांडला 2 लाख कोटी रुपयांचा आकडा

अनुराधा कोरवी

मुंबई ः पुढारी वृत्तसेवा : देशात वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) संकलनात विक्रमी वाढ झाली आहे. सरकारने एप्रिल 2024 मध्ये जीएसटीमधून विक्रमी 2.10 लाख कोटी रुपये जमा केले आहेत. आतापर्यंत कोणत्याही महिन्यात जमा झालेला हा सर्वाधिक जीएसटी आहे. यापूर्वीचे सर्वोच्च संकलन 1.87 लाख कोटी रुपये एप्रिल 2023 मध्ये झाले होते.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जीएसटी हा आकडा त्यांच्या एक्स खात्यावर पोस्ट करून आनंद व्यक्त केला आहे. अर्थ मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, एका महिन्यात प्रथमच जीएसटी महसूल 2 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेला आहे. यापूर्वी मार्च महिन्यातही मोठ्या प्रमाणात जीएसटी वसुली झाली होती. त्यात वार्षिक आधारावर 11.5 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

केंद्रीय आणि राज्य जीएसटी

एप्रिल 2024 मध्ये एकूण जीएसटी संकलनापैकी सरकारने केंद्रीय जीएसटीद्वारे 43,846 कोटी रुपये, राज्य जीएसटीद्वारे 53,538 कोटी रुपये आणि एकात्मिक जीएसटीद्वारे 99,623 कोटी रुपये जमा केले. इंटिग्रेटेड जीएसटीमध्ये आयात केलेल्या वस्तूंद्वारे प्राप्त झालेल्या 37,826 कोटी रुपयांच्या कराचाही समावेश आहे. एप्रिल महिन्यात जीएसटी उपकर संकलन 13,260 कोटी रुपये होते. यामध्ये आयात केलेल्या वस्तूंमधून जमा झालेल्या 1,008 कोटी रुपयांचाही समावेश आहे.

SCROLL FOR NEXT