Latest

Grapes benefits : हिरवी की काळी ? आरोग्यासाठी लाभदायी द्राक्षं कोणती, जाणून घ्या

अमृता चौगुले

पुढारी डिजीटल : थंडीचा उत्तरार्ध सुरू झाला की फळ बाजार रंगीबेरंगी होऊ लागतो. आकर्षक रंगाची फळं बाजारात दिसू लागतात. आरोग्याच्या दृष्टीने हा ऋतू सर्वोत्तम समाजाला जातो. या सीझनमध्ये बाजारात सर्वत्र दिसणारं फळ म्हणजे द्राक्षं. हिरव्या आणि काळ्या रंगात असलेली द्राक्षं अनेकांची आवडती असतात.

पोटॅशियम आणि विटामीन सी चा उत्तम स्त्रोत असलेली द्राक्षं अनेकदा लाल रंगातही उपलब्ध असतात. अशा वेळी आरोग्यदायी किंवा शरीरासाठी तुलनेने लाभदायक असलेली द्राक्षं कोणती हा प्रश्न तुम्हालाही पडत असेल तर पुढील मुदद्यांवरून तुमचं कंफ्यूजन दूर व्हायला मदत होईल. हिरवी असोत किंवा काळी दोन्ही द्राक्षांचे काही खास फायदे आहेत. त्यापैकी आपण सर्वप्रथम हिरव्या द्राक्षांचे फायदे जाणून घेणार आहोत.

• हिरवी द्राक्षं आरोग्यासाठी अत्यंत चांगली आहेत. ह्रदयविकारासाठी हिरवी द्राक्षं उपयुक्त समजली जातात. द्राक्षाचा रस ह्रदयरोगावर उपयुक्त आहे .
• ही द्राक्षं नैराश्यासाठी लाभकारी ठरतात.
• फायबरचं प्रमाण हिरव्या द्राक्षात जास्त असतं. पोट साफ होण्यात समस्या येत असल्यास हिरव्या द्राक्षांचं सेवन करावं

आता पाहू काळ्या द्राक्षांचे कोणते फायदे आहेत

• साखरेचं प्रमाण जास्त असल्याने खरं तर मधुमेहींनी द्राक्षं खाणं टाळावं असं सांगितलं जातं. पण काळी द्राक्षं मात्र याला अपवाद आहेत. त्यामुळे मधुमेहीदेखील या द्राक्षांचं सेवन करू शकतात.
• काळी द्राक्षं त्वचेसाठी अत्यंत गुणकारी असतात. यांच्यात वृद्धत्वाची गती कमी करणारे घटक असतात. त्यामुळे त्वचा तजेलदार आणि चिरतरुण ठेवण्यासाठी प्रयत्नशील असाल तर काळ्या द्राक्षांच जरूर सेवन करा.
• वेट लॉस करणार असताना सहसा द्राक्षं खाऊ नयेत असा सल्ला दिला जातो. पण काळी द्राक्षं खाल्ल्याने वेट लॉस होण्यात फायदाच होतो असं संशोधनात दिसून आलं आहे.
• छातीत जळजळ होत असल्यास काळ्या द्राक्षांच्या सेवनाने जळजळ कमी होते.

अलिकडेच बाजारात लाल द्राक्षंही दिसू लागली आहेत. काळ्या द्राक्षांप्रमाणेच लाल द्राक्षंही त्वचेसाठी उपयुक्त असतात. या द्राक्षांचा लेप त्वचेवर लावल्यास त्वचा तुकतुकीत होण्यास मदत होते. त्वचेचा दाह होत असल्यास ही द्राक्षं मॅश करून त्यावर लावावी दाह कमी होतो.

SCROLL FOR NEXT