Latest

Marathi Researcher : संशोधन क्षेत्रात मराठीची गुढी; ५ मराठी संशोधक ठरले आशियात सर्वोत्तम

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : सिंगापूर येथून प्रसिद्ध होत असलेल्या संशोधन क्षेत्रातील नियतकालिक 'एशियन सायंटिस्ट' आशियातील खंडातील १०० सर्वोत्तम संशोधकांची यादी जाहीर केली आहे. या यादीत ५ मराठी संशोधकांचा (Marathi Researcher) समावेश आहे. गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला जाहीर झालेली ही यादी साऱ्या महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद ठरली आहे. हे नियतकालिक २०१६पासून दरवर्षी ही यादी जाहीर करत असते.

या यादीत मुंबईतील ३, पुण्यातील १ तर मुळचे अकोल्याचे असलेल्या एका संशोधकाचा समावेश आहे. या यादीत पद्मश्री पुरस्कार विजते डॉ. जी. डी. यादव यांचा समावेश आहे. यादव रसायन शास्त्रातील दिग्गज संशोधक मानले जातात. ते मुंबईतील सुप्रसिद्ध इंडियन इन्सिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीचे माजी कुलुगुरू आहेत. यादव हे मुळचे कोल्हापूरचे आहेत. (Marathi Researcher)

याच यादीत मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्समधील संशोधक निस्सिम कानेकर आणि विदिता वैद्य यांचा समावेश आहे. कानेकर एरोस्पेस आणि खगोलशास्त्र या विषयात संशोधन करतात. त्यांना २०२२चा इन्फोसिस पुरस्कार ही मिळाला आहे. तर वैद्य यांना २०२२चा इन्फोसिस पुरस्कार, २०१५चा शांती स्वरूप भटनागर पुरस्कार मिळाला आहे. त्या लाईफ सायन्स क्षेत्रात संशोधन करतात.

या यादीत समावेश असलेले रवींद्र कुलकर्णी हे पुण्याचे आहेत. एलकाय केमिकल्स या कंपनीचे ते संस्थापक आहेत. यूएस नॅशनल अॅकॅडमी ऑफ इंजिनिअरिंगवर ते इंटरनॅशल फेलो म्हणून कार्यरत आहेत.

या यादीत गणितज्ज्ञ महेश ककडे यांचा समावेश आहेत. महेश ककडे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये कार्यरत आहेत. ते मुळचे अकोल्याचे आहेत. ककडे यांना २०२२चा इन्फोसिस पुरस्कार मिळाला आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT