Latest

महापालिका, नगरपरिषद व जिल्हा परिषद प्रकल्पांना महापुरुषांची नावे बंधनकारक करणार : अजित पवार

अमृता चौगुले

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध प्रकल्पांना नगरसेवक किंवा लोकप्रतिनिधींच्या नातेवाईकांचे किंवा स्थानिक व्यक्तीची नावे दिली जातात. ही प्रथा चुकीची असून, महापुरुषांची नावे प्रकल्पांना द्यायला हवेत,असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.

नागरिकांना त्या महापुरुषांच्या नावातून प्रेरणा मिळेल. ही बाब लक्षात घेऊन राज्य सरकार तसा नियमच सर्व महापालिका, नगरपरिषद व जिल्हा परिषदेला बंधनकारक करणार आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. पिंपरी-चिंचवड शहराच्या दौर्‍यावर आले असता ते बोलत होते.

भोसरीतील सखुबाई गवळी उद्यानात पालिकेतर्फे उभारण्यात येत असलेल्या बहुमजली वाहनतळाचे भूमीपूजन झाले. त्याचा संदर्भ देत पवार म्हणाले की, कासारवाडीतील उड्डाणपुलाला जे. आर. डी. टाटा असे नाव दिले. चिंचवडच्या पुलास मदर टेरेसा नाव दिले. महापुरुषांची नावे पालिकेच्या व सार्वजनिक योजना व प्रकल्पास दिली गेली पाहिजेत. त्या नावाचा अभिमान वाटला पाहिजे.

SCROLL FOR NEXT