Latest

सर्वसामान्यांना दिलासा : खाद्यतेलाच्या किंमती होणार स्वस्त; सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय

दीपक दि. भांदिगरे

नवी दिल्ली : देशात सध्या खाद्यतेलांच्या किमती देशभरात गगनाला भिडलेल्या आहेत. शेंगदाणा तेल, सूर्यफूल तेल, सोया तेल असे जवळपास सर्वच प्रकारचे खाद्यतेल सध्या महाग झाले आहेत. यातून दिलासा देण्यासाठी सरकारने सूर्यफूल आणि सोयाबीनच्या कच्चा तेलाच्या आयातीलवरील कस्टम आणि शेतीपायाभूत विकाससाठीचा सेस हटवला आहे. दोन्ही प्रकारच्या तेलांच्या प्रत्येकी २० लाख टन आयातीसाठी हा निर्णय लागू करण्यात आला आहे.

वित्त मंत्रालयाने हा निर्णय घेतला असून २५ मे पासून याची अंमलबजावणी होईल. ३१ मार्च २०२४ पर्यंत हा निर्णय लागू असेल.
या निर्यणात म्हटले आहे की, "सरकारने सोयाबीनचे २० लाख टन कच्चे तेल, तर सूर्यफुलाचे २० लाख टन कच्चे तेल आयात करण्यासाठी परवानगी दिली आहे. या निर्यातीवर कोणतीही कस्टम आणि शेतीपायाभूत सुविधा सेस लावला जाणार नाही,"

भारत हा खाद्यतेलासाचा सर्वांत मोठा आयातदार देश आहे. भारतातील एकूण गरजेच्या ६० टक्के खाद्यतेल आयात करावे लागते. भारतात येणारे सूर्यफुलाचे तेल हे बहुतांश युक्रेन आणि युरोपमधून येते. या दोन्ही देशांतील युद्धामुळे सूर्यफुल तेलाचे दर चांगलेच भडकले आहेत

SCROLL FOR NEXT