Latest

ऑनलाइन कर्ज देणाऱ्या अॅप्सवर गुगलची बंदी; ३१ मेपासून लागू होणार नवीन नियम

मोहन कारंडे

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : गुगलचे नवीन आर्थिक सेवा धोरण जाहीर (Google's Financial Services policies) झाले आहे. या धोरणात गुगलने ऑनलाइन कर्ज देणाऱ्या अॅप्सवर बंदी घालण्याची घोषणा केली आहे. हे धोरण ३१ मे २०२३ पासून देशभर लागू होणार आहे.

अशा परिस्थितीत जर तुमच्या फोनमध्ये कर्ज देणारी अॅप्स असतील. ज्यामध्ये तुमचा वैयक्तिक डेटा असेल. तर तो डेटा डिलीट करणे किंवा ३१ मे पूर्वी डेटा सेव्ह करणे आवश्यक असेल. अन्यथा ३१ मे नंतर वैयक्तिक डेटा हटवला जाईल. दरम्यान, ऑनलाइन कर्ज देणाऱ्या अॅप्सच्या माध्यमातून अनेक दिवसांपासून फसवणूक होत असल्याची गंभीर प्रकरणे समोर येत आहेत. वापरकर्त्यांचे संपर्क, कर्ज देणाऱ्या अॅप्सवरील फोटोची माहिती अशा संवेदनशील डेटाची चोरी केल्याच्याही तक्रारी सातत्याने पुढे येत आहेत.

SCROLL FOR NEXT