Latest

‘गुगल’ने जी-मेलसाठी आणली तीन नवी फीचर्स

अमृता चौगुले

  वॉशिंग्टन ः 'गुगल' शिवाय अनेकांचे हल्ली अक्षरशः 'पान'ही हलत नाही. 'गुगल'कडून आपल्या असंख्य वाचकांसाठी नवी नवी फीचर्स सातत्याने आणली जात असतात. गुगलची लोकप्रिय ई-मेल सेवा जी-मेलचा वापर जगभरात सर्वाधिक केला जातो. ऑफिसमधील प्रत्येक कामासाठी खासकरून गुगलच्या याच ई-मेल सेवेचा वापर केला जातो. आता गुगलने जी-मेल आणि गुगल चॅटस् वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी आणली आहे.

गुगलने तीन नवीन फीचर्सची घोषणा केली असून या फीचर्सच्या मदतीने यूजर्सना वेब आणि मोबाईलवर चांगला सर्च अनुभव मिळणार आहे. कंपनीच्या मते, या फीचर्सच्या मदतीने वापरकर्त्यांना अधिक अचूक आणि कस्टमाइज्ड सर्च सिलेक्शन आणि रिझल्ट मिळतील. नवीन वैशिष्ट्यांच्या सूचीमध्ये शोध सूचना, जी-मेल लेबल आणि संबंधित परिणामांचा समावेश आहे.

सध्या, ही वैशिष्ट्ये सर्व वापरकर्त्यांसाठी जारी केलेली नसून हे फक्त काही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत आणि येत्या काही दिवसांत त्यांचा विस्तार केला जाणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे. हे तिन्ही फीचर्स सर्व गुगल वर्कप्लेस ग्राहक, जी सूट बेसिक आणि बिझनेस वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहेत.

गुगल चॅट शोध सूचना वैशिष्ट आधीपासूनच अँड्रॉईड डिव्हाईसवर उपलब्ध आहे आणि ऑक्टोबरच्या अखेरीस आयओएस वापरकर्त्यांसाठी आणले जाणार आहेत. नवीन जी-मेल आणि चॅट फीचर्स वापरकर्त्यांसाठी खूप उपयुक्त ठरू शकते. चॅटची शोध, सूचना, वैशिष्ट्ये वापरकर्त्यांच्या मागील शोध इतिहासावर आधारित शोध क्वेरी सुचवतील. म्हणजेच, तुम्ही एखादी गोष्ट टाईप करताच, तुम्हाला चॅट सर्च बारमध्ये त्याच्याशी संबंधित सूचना मिळू लागतील. याच्या मदतीने यूजर्स महत्त्वाचे मेसेज, फाईल्स पुन्हा पाहू शकतात

SCROLL FOR NEXT