Latest

Gold Rates : सोने दरात घसरण सुरूच; जाणून घ्या ‘प्रति तोळा’ आजचा दर

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सोने दरातील घसरण सुरूच आहे. दरम्यान आज (दि.१८) पुन्हा सोने दरात घट झाली असून, प्रति तोळा सोने  495 रूपयांनी स्वस्त झाले आहे. तर चांदी प्रति किलो 599 रूपयांनी घसरली आहे, असे इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशने आज दिलेल्या दरात स्पष्ट केले आहे. गुतवणूकदार शेअर बाजारातील गुंतवणुकीकडे वळल्याने सोने-चांदी बाजारात ही स्थिती पाहायला मिळत आहे. (Gold Rates)

इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशने (IBJA) दिलेल्या ताज्या अपडेटनुसार, आज सोन्याचा दर घसरला असून, तो 61872 रुपये प्रति दहा ग्रॅम असा आहे. यापूर्वी १५ शुक्रवारी हाच सोने दर 62367 रुपये प्रति दहा ग्रॅम इतका होता. त्यामुळे आज सोन्याचा दर 495 रुपये प्रति दहा ग्रॅम इतका घसरला आहे. याच महिन्यात सोमवारी ४ डिसेंबरला सोने दराने उच्चांक गाठला होता. यादिवशी सोने भाव हा 63281 रुपये प्रति दहा ग्रॅम इतका होता. (Gold Rates)

IBJA ने आज दिलेल्या माहितीनुसार, चांदी दर हा सध्या प्रति किलो 73674 रुपये आहे. तर यापूर्वी हा दर 74273 रुपये प्रतिकिलो होता. दरम्यान चांदी दरात देखील 599 रुपयांची घसरण झाली आहे. गुरूवार 30 नोव्हेंबर 2023 रोजी चांदीने 76934 रुपये इतका उच्चांक गाठला होता. (Gold Rates)

Gold Rates: सोने- चांदी दरात का होतेय घसरण

नोव्हेंबरच्या शेवटी आणि डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सोने चांदी दराने उच्चांत गाठला होता. त्यानंतर सातत्याने सोने चांदी दरात काही प्रमाणात घट सुरूच आहे. दरम्यान अमेरिकेतून व्याजदर कपातीची बातमी समोर आल्यापासून सोन्याचे दर झपाट्याने खाली जात आहेत. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे गुंतवणूकदारांना सोन्यापेक्षा आता शेअर बाजारात जास्त परतावा मिळेल असे वाटत आहे. त्यामुळे गुंतवणूकदार त्यांची गुंतवणूक सोने-चांदी ऐवजी शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात करत आहेत. अशा परिस्थितीत सोन्याऐवजी आता शेअर बाजारात गुंतवणूक जात आहे. त्यामुळे सोन्याचे दर सातत्याने कमी होत आहेत, असे 'गोल्डरिटर्न्स'ने म्हटले आहे.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT