Latest

Goa Tourism News: गोव्यात पर्यटकांसाठी ‘गोवा टॅक्सी अ‍ॅप’; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्धाटन

मोनिका क्षीरसागर

पणजी: पुढारी वृत्तसेवा; गोव्यात दरवर्षी 40 ते 42 लाख पर्यटक येतात. त्यांच्या सोयीसाठी गोवा सरकारने 'गोवा टॅक्सी अ‍ॅप' सुरू केले असून, या अ‍ॅपचे उद्धाटन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते आज पणजीत करण्यात आले. यावेळी पर्यटन मंत्री रोहण खंवटे, गोवा पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष आमदार गणेश गावकर, पर्टन सचिव संजय गोयल, संचालक सुनील आंचीपका आदी उपस्थित होते. (Goa Tourism News)

यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, यापूर्वी गोवा माईल्स हे खाजगी टॅक्सी अ‍ॅप गोव्यात टॅक्सीस सेवेसाठी उपलब्ध केले होते. मात्र आता गोवा सरकारने राज्यात येणार्‍या पर्यटकाना दर्जेदार व सुरक्षित टॅक्सी सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी हे अ‍ॅप सुरू केले आहे. नव्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून गोव्याचा विकास करताना टॅक्सीसेवेतही नवे तंत्रज्ञान वापरणे गरजेचे ठरते. त्यानुसार हे अ‍ॅप सुरू केले गेले आहे. या अ‍ॅपला गोव्यातील 500 टॅक्सी चालक आत्तापर्यंत सलग्न झाले आहेत. गोव्यात दर्जेदार पर्यटक यावेत आणि त्यांना दर्जेदार सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी सरकारचे प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. (Goa Tourism News)

गोव्यात येणारे पर्यटक टॅक्सीचालक जास्त भाडे घेतात अशा तक्रारी करतात या अ‍ॅपच्या माध्यमातून त्या तक्रारी दूर होणार आहेत. त्यामुळे सर्व टॅक्सी चालकांनी या अ‍ॅपला सलग्न व्हावे असे आवाहन यावेळी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केले. हे अ‍ॅप टॅक्सीचालक व प्रवाशी या दोघांच्या हिताचे असल्याने कुणी त्याला नाहक विरोध करु नये. असे आवाहन यावेळी मुख्यमंत्र्यानी केले. (Goa Tourism News)

'अतिथी देवो भव' या संकल्पनेनुसार पर्यटकाना विविध सेवा पर्यटन खाते उपलब्ध करते. पर्यटकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात, नवे अनुभव मिळावेत त्याचबरोबर त्यांना गोव्यातील पर्यटनाचा लाभ घेताना अडचणी येऊ नयेत यासाठी सरकार जे प्रयत्न करते त्याचाच एक भाग हे अ‍ॅप असल्याचे रोहण खवंटे म्हणाले. टॅक्सी चालकाशी चर्चा करूनच हे नवे तंत्रज्ञानाचे गोवा टॅक्सी अ‍ॅप उपलब्ध केल्याचे खवंटे म्हणाले.

Goa Tourism News: टॅक्सीचालकांचे कल्याण होईल

टॅक्सीचे भाडे वगळून अ‍ॅपसाठी जी थोडी रक्कम जमा होणार आहे, ती टॅक्सीचालकांच्या हितासाठी वापरली जाईल. टॅक्सीचालकांच्या घरातील विधवा महिला, ज्येष्ठ टॅक्सीचालक, टॅक्सीचालकांच्या मुलींचे लग्न व मुलांना शिष्यवृत्ती अशा स्वरूपात ही रक्कम खरेच होणार असून ती सरकार खर्च करणार नाही तर टॅक्सीचालकच करणार आहेत. अशी माहिती रोरहण खंवटे यांनी दिली.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT