Latest

आयपीएस अधिकारी निलंबित; पबमध्ये महिलेशी गैरवर्तन भोवले

अमृता चौगुले

पणजी : पुढारी व्रुत्तसेवा :  कळंगुटमधील पबमध्ये महिलेशी गैरवर्तन करणारे पोलीस उपमहानिरीक्षक (डीआयजी) आयपीएस डॉ. ए. कोन यांना अखेर केंद्रीय गृहमंत्रालयाने सेवेतून निलंबित केले आहे. कळंगुटमधील एका पबमध्ये मद्यधुंद अवस्थेत महिलेशी गैरवर्तन केल्याचा डॉ. कोन यांचा व्हिडिओ प्रसिद्ध झाल्यानंतर राज्यभर खळबळ माजली होती.

राज्य सरकारने व्हिडिओ तत्काळ दखल घेत त्यांच्याकडे सोपवलेला गोवा पोलीस उपमहानिरीक्षकपदाचा ताबा काढून घेतला आणि पोलीस महासंचालकांना (डीजीपी) रिपोर्ट करण्याचे आदेश त्यांना जारी केला होता. हे प्रकरण केंद्रीय गृहमंत्रालयाकडे पोहोचवले आहे. गृहमंत्रालय याबाबत निर्णय घेईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्यानंतर स्पष्ट केले होते. त्यानुसार, अखेर गृहमंत्रालयाने डॉ. कोन यांना दोषी ठरवत त्यांना सेवेतून  निलंबित केले. या प्रकारामुळे गोव्यात येऊन पदाचा गैरवापर करणाऱ्या आयपीएस अधिकाऱ्यांना चफराक बसली आहे.

.हेही वाचा 

SCROLL FOR NEXT