Latest

गोव्यात दिवसभरात ७८.९४% मतदान!

निलेश पोतदार

पणजी : पुढारी वृत्तसेवा

गोव्यात विधानसभेसाठी आज मतदान झाले. सकाळी ७ वाजल्यापासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत राज्यात ७८.९४% मतदान झाले. २०१७ मध्ये एकूण ८२.५६ टक्के मतदान झाले होते. राज्यातील पोस्टल मतदान अदयाप मोजण्यात आलेले नाही. त्यामुळे आणखी एखादा टक्का वाढण्याची शक्यता आहे. मात्र २०१७ च्या तुलनेत कमी टक्के मतदान झाले आहे. अधिक माहिती काही वेळात निवडणूक आयोगाकडून सामायिक केली जाईल.

राज्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या मतदारसंघात सर्वाधिक ८९.६४ टक्के मतदान झाले आहे. तर बाणावली मतदारसंघात सर्वात कमी ७०.०२ टक्के मतदान झाले आहे. राज्यातील सर्व मतदारसंघात ७५ टक्के हून अधिक मतदान झाले आहे.

मतदारसंघ निहाय मतदानाची टक्केवारी खालीलप्रमाणे

goa election voting
goa election voting
goa election voting
SCROLL FOR NEXT