Latest

मराठा समाजाला वेगळे आरक्षण देऊ : चंद्रकांत पाटील

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रात सध्या मराठा आरक्षणावरून गोंधळ सुरू आहे. पण मराठा समाजाला आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक मागासलेपणाचे आरक्षण देण्याच्या बाजूने भाजप आहे, असे शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. भाजप ओबीसी मोर्चा पुणे शहरच्या नवनियुक्त कार्यकारिणीच्या पदाधिकार्‍यांना शनिवारी नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
पाटील म्हणाले, आमचा पक्ष ताकाला जाऊन भांडे लपवणारा नाही. जे आहे ते बिनदिक्कतपणे मांडतो. येत्या आठवडा-पंधरा दिवसांत मराठा समाजाचे सर्वेक्षण पूर्ण होणार आहे. त्याच्या आधारे मराठा समाज मागास कसा आहे हे मांडू, असेही त्यांनी सांगितले.

नोंदी सापडतील त्यांनाच प्रमाणपत्र
कुणबी नोंदी ज्यांच्या आहेत, त्यांना वर्षानुवर्षे सर्टिफिकेट मिळत आहेत. कुणबी प्रमाणपत्र मिळेल त्याला ओबीसी समाजाचा विरोध नाही. पण सरसकट सगळ्यांना कुणबी म्हणण्यास ओबीसी समाजाचा विरोध आहे. ज्यांच्या कुणबी नोंदी सापडत आहेत, त्यांना प्रमाणपत्र मिळाले पाहिजे, अशी सरकारची भूमिका आहे.

काहीजण सत्तेत नसले की दंगली होतात : पवारांवर टीकास्त्र
चंद्रकांत पाटील म्हणाले, काहीजण असे आहेत की, ते सत्तेत नसले की दंगली होतात, जातीय संघर्ष निर्माण होतात, अशी टीका त्यांनी शरद पवार यांचे नाव न घेता केली. काल एका मोठ्या नेत्याने एकनाथ शिंदे यांनी सगेसोयरे यांना कुणबी सर्टिफिकेट देऊ, असे म्हटल्याचे सांगितले. असे वाक्य शोधून भांडणे लावायचा प्रकार सुरू आहे. सत्तेत असताना तुम्ही मराठा समाजाला न्याय का नाही दिला.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT