Latest

कोल्हापूर : पुढारी टॅलेंट सर्च एक्झाममध्ये मुलींची बाजी!

दिनेश चोरगे

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : दै. 'पुढारी'च्या वतीने पहिल्यांदाच जिल्हा स्तरावर घेण्यात आलेल्या 'पुढारी टॅलेंट-सर्च एक्झाम'चा निकाल जाहीर झाला. परीक्षेत अव्वल ठरत मुलींनीच बाजी मारली आहे. अनुज कनोजे (तिसरी), परिणिती मोरे (चौथी), नेहा चौगुले (पाचवी), राधिका पाटील (सहावी), श्रुतिका पाटील (सातवी), मधुरा वाडीकर (आठवी) या विद्यार्थिनींनी अनुक्रमे पहिला क्रमांक पटकावला आहे.

तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची 'पुढारी टॅलेंट-सर्च एक्झाम' मराठी व सेमी इंग्लिश, इंग्लिश माध्यमांमध्ये 3 फेब—ुवारी रोजी झाली. जिल्ह्यात 31 व कोल्हापूर शहरात 9 परीक्षा केंद्रे होती. परीक्षेला सुमारे 13 हजारांहून अधिक विद्यार्थी बसले होते. सकाळ व दुपारच्या सत्रांत 'ओएमआर' शीटवर घेण्यात आलेल्या परीक्षेसाठी 300 गुण होते. या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. दै.'पुढारी'च्या वतीने या परीक्षेसाठी जिल्हा, तालुका, केंद्रनिहाय भरघोस बक्षिसे जाहीर केली आहेत. त्यानुसार जिल्हास्तरीय 3 री ते 8 वी प्रत्येक वर्गनिहाय पाच अशी मिळून 30 बक्षिसे काढली आहेत. तालुकानिहाय प्रत्येक वर्गातील 3 प्रमाणे 18 बक्षिसे दिली जाणार आहेत, तर प्रत्येक केंद्रातून प्रत्येक वर्गातील एका विद्यार्थ्यास उत्तेजनार्थ पारितोषिक दिले जाणार आहे. उत्तेजनार्थ विद्यार्थ्यांची नावे लवकरच दै. 'पुढारी' वर्तमानपत्रातून जाहीर केली जाणार आहेत.

जिल्हास्तरीय वर्ग, इयत्तानिहाय निकाल पुढीलप्रमाणे…

इयत्ता (3 री) : अनुज कनोजे – प्रथम (कन्या विद्यामंदिर, रुई), श्रीनिधी मगदूम – द्वितीय (सेंट्रल प्रायमरी स्कूल, शाहूवाडी),
पीयुश पाटील- तृतीय (मराठी विद्यामंदिर, कडलगे खुर्द), शुभंकर लाड- चौथा (विद्यामंदिर, सैदापूर), प्रज्वल गिरवले- पाचवा (विद्यामंदिर, उकोली).
इयत्ता (4 थी) : परिणिती मोरे – प्रथम (विद्यामंदिर, दारवाड), श्रावणी मिसाळ – द्वितीय (कुमार विद्यामंदिर, पाडळी खुर्द), राजवीर रेडेकर- तृतीय (विद्यामंदिर, दारवाड), शंतनु शिरोळे- चौथा (शिवाजी विद्यामंदिर क्र.2, मुरगूड), श्लोक भारमल- पाचवा (शिवाजी विद्यामंदिर क्र.2, मुरगूड).
इयत्ता (5 वी) : नेहा चौगुले – प्रथम (विद्यामंदिर, म्हाकवे), सृष्टी साळवे – द्वितीय (महापालिका टेंबलाबाई विद्यामंदिर, टेंबलाईवाडी), आराध्या पाटील- तृतीय (विद्यामंदिर, म्हाकवे), ज्ञानेश्वरी पाटील- चौथा (विद्यामंदिर, म्हाकवे), स्वरांजली करवळ- पाचवा (विद्यामंदिर सोनाळी).
इयत्ता (6 वी) : राधिका पाटील – प्रथम (मोहाडे-चापोडी), प्रणव आरभावे – द्वितीय (महापालिका लक्ष्मीबाई जरग विद्यामंदिर, कोल्हापूर), विभावरी पाटील- तृतीय (विद्यामंदिर, आकुर्डे), प्रदीप लोणार- चौथा (संदिपानी विद्यासागर विद्यालय, बापूरामनगर, कोल्हापूर), अर्णव गावडे- पाचवा (विद्यामंदिर धामपूर).
इयत्ता (7 वी) : श्रुतिका पाटील – प्रथम (जीवन शिक्षण विद्यामंदिर, साळशी), यश पाटील – द्वितीय (विद्यामंदिर, तिरवडे), वैभवी भेंडवडेकर- तृतीय (विद्यामंदिर तिरवडे), सिद्धी पाटील- चौथा (विद्यामंदिर, तिरवडे), अवंतिका पाटील- पाचवा (विद्यामंदिर, परखंदळे).
इयत्ता (8 वी) : मधुरा वाडीकर – प्रथम (वसंतराव देशमुख हायस्कूल, सानेगुरुजी वसाहत, कोल्हापूर), आदर्श शेटके – द्वितीय (पी. बी. पाटील हायस्कूल, मुधाळ), आयुषा फडके- तृतीय (छत्रपती शिवाजी हायस्कूल, माणगाव), गौरी भारती- चौथा (वसंतराव देशमुख हायस्कूल, सानेगुरुजी वसाहत कोल्हापूर), सुहानी र्‍हाटवळ- पाचवा (वसंतराव देशमुख हायस्कूल, सानेगुरुजी वसाहत, कोल्हापूर).

शहर गुणवत्ता यादीत लक्ष्मीबाई जरग विद्यामंदिरचा झेंडा

कोल्हापूर शहरातील 3 री ते 8 वीचा पुढारी टॅलेंट सर्च परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यात वर्गनिहाय प्रथम क्रमांकाची तीन बक्षिसे काढली आहेत. यात महापालिकेच्या लक्ष्मीबाई जरग विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी शासकीय शिष्यवृत्तीप्रमाणे गुणवत्तेचा झेंडा रोवला आहे.

इ. 3 री : कार्तिक पोवार (प्रथम- लक्ष्मीबाई जरग विद्यामंदिर), संस्कृती चौगुले (प्रथम- लक्ष्मीबाई जरग विद्यामंदिर), इशान मुल्ला (प्रथम- लक्ष्मीबाई जरग विद्यामंदिर). 4 थी : आयुष तौंदकर (प्रथम- रा. ना. सामाणी विद्यामंदिर), संस्कार पाटील (प्रथम- लक्ष्मीबाई जरग विद्यामंदिर), सर्व्हेश पाटील (प्रथम- लक्ष्मीबाई जरग विद्यामंदिर). 5 वी : हर्षदा सुतार (प्रथम- टेंबलाईवाडी विद्यामंदिर), पार्थ जठार (प्रथम- लक्ष्मीबाई जरग विद्यामंदिर), अर्णव चव्हाण (प्रथम- लक्ष्मीबाई जरग विद्यामंदिर). 6 वी : यशोवर्धन शेंडेे (प्रथम- लक्ष्मीबाई जरग विद्यामंदिर), सर्वज्ञा गावडे (प्रथम- लक्ष्मीबाई जरग विद्यामंदिर), अनन्या पोवार (प्रथम- लक्ष्मीबाई जरग विद्यामंदिर). 7 वी : शब्दश्री शिपुगडे (प्रथम- प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूल), समृद्धी केंद्रे (प्रथम- लक्ष्मीबाई जरग विद्यामंदिर), सृष्टी बामणे (माईसाहेब बावडेकर माध्यमिक विद्यालय). 8 वी : चैतन्य कुंभार (प्रथम- वसंतराव देशमुख हायस्कूल), आदित्य घेवारी (प्रथम- वसंतराव देशमुख हायस्कूल), सक्षम सोनाळकर (प्रथम- वसंतराव देशमुख हायस्कूल).

SCROLL FOR NEXT