Latest

नंदुरबार : जलजीवन’च्या अपूर्ण विहिरीने घेतला मुलीचा बळी ; ठेकेदाराविरुद्ध सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल

गणेश सोनवणे

नंदुरबार – जल जीवन मिशन अंतर्गत करण्यात आलेल्या विहिरीच्या अपूर्ण खोदकामाने अल्पवयीन मुलीचा बळी घेतला असून या कामाच्या ठेकेदाराविरुद्ध सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल झाला आहे. मयत मुलीचे नाव अक्षरा किसन पावरा वय ७ वर्षे रा. आमला पलाटपाडा ता. धडगाव असे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले.

धडगाव तालुक्यातील आमला गावाच्या शिवरातल जल मिशन योजने अंतर्गत पाणीपुरवठ्यासाठी खोदकाम सुरू असलेल्या विहिरीत ही मुलगी पडून मरण पावली, असे मुलीचे वडील पंडीत मानकर पावरा वय- ४२ रा आमला पलाटपाडा ता. धडगाव यांनी फिर्यादीत म्हटले आहे. या याबाबत फिर्यादीत म्हटले आहे की, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद नंदुरबार अंर्तगत जल मिशन योजने अंतर्गत आचपा ग्राम पंचायत अंतर्गत आमला गावात पाणीपुरवठ्यासाठी विहिरीचे खोदकाम ठेकदार ऋषीकेश सुरेश चौधरी रा. तळोदा यांनी केले असून हे काम अद्याप अपूर्ण आहे. तथापि विहीरीचे खोदकाम करतांना विहिरीच्या आजुबाजुला कुंपण किंवा निशानी लावली नाही, तर लहान मुले गुरे यांचा पाय घसरुन पाण्यात बुडून जिव जाण्याचा संभव आहे; असे माहित असतांना विहिरीचे खोदकाम सुरु असतांना विहिरीच्या आजुबाजुच्या कुंपण किंवा काम सुरु असल्याबाबत निशाणी लावलेली नाही. त्यामुळेच अक्षरा किसन पावरा ही विहीरीजवळ गेली आणि पाय घसरुन विहिरीत पडुन मरण पावली, अशी नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली तसेच ठेकेदार ऋषिकेश चौधरी याच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  अधिक तपास हेड कॉन्स्टेबल राजेंद्र जाधव करीत आहेत.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT