Latest

Giorgia Andriani : अरबाजच्या गर्लफ्रेंडचे ‘हे’ फोटो पाहून चाहते झाले घायाळ

Arun Patil

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेता-निर्माता अरबाज खानची एक्स वाईफ मलायका अरोरा नेहमी सोशल मीडियात चर्चेत असतेच, पण अरबाज सध्या जिच्याशी रिलेशनमध्ये असल्याच्या चर्चा होतात ती त्याची मैत्रिण जॉर्जिया अँड्रियानी (Giorgia Andriani) ही देखील अधेमध्ये लाईमलाईट स्वतःकडे वळवून घेत असते. तशी ती तिने आताही घेतली आहे. याचे कारण म्हणजे जॉर्जियाचे नवे फोटोज.

जॉर्जियाने नुकतेच इन्स्टाग्रामवर काही फोटोज शेअर केले आहेत. कारण तिचे हे फोटोज पारदर्शक ड्रेसमधील आहेत. हे फोटोज व्हायरल झाले आहेत. विशेष म्हणजे हा ड्रेस परिधान करून अभिनेत्रीने कॅमेऱ्यात अशा काही पोज दिल्या की सारेच थक्क झाले.

अरबाजने जॉर्जियाच्या (Giorgia Andriani) हॉट आणि बोल्ड लुक पाहून तिच्यावर फिदा झाला आहे. जॉर्जिया तिच्या याच हॉट आणि बोल्ड लुकमुळे सर्वाना माहित आहे. तिचा स्वत:चा एक चाहतावर्ग आहे. तिला स्टायलिश राहायला खूप आवडते. तिने नुकतेच एक असा फोटोशूट केले आहे. ते फोटोशूट पाहून अनेक चाहत्यांनी कमेंटमध्ये जॉर्जिया आणि मलायकाची तुलना केली आहे. त्यात काहींनी जॉर्जिया ही मलायकापेक्षा जास्त हॉट असल्याचे म्हटले आहे.

जॉर्जियाचा हा पोशाख केवळ पारदर्शक नाही तर त्यात साईडला स्लिट जास्त आहे. या स्लिट कटमुळे अभिनेत्रीचा टॅटूही दिसत आहे. विशेष बाब म्हणजे जॉर्जियाने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत. याआधीही जॉर्जियाने बोल्ड फोटोशूट केलेले आहे. जॉर्जिया तिच्या या बोल्ड फोटोशूटमुळे कायमच चर्चेत असते. विशेष म्हणजे तिच्या या फोटोंवर काही क्षणातच कमेंट्सचा वर्षावसुद्धा होतो. आपल्या मादक अदांनी, लूक्सने ती नेहमीच तिच्या चाहत्यांना घायाळ करते. जॉर्जियाने केलेल्या फोटोशूटने बोल्डनेसच्या साऱ्याच मर्यादा ओलांडल्या आहेत असं म्हणायला हरकत नाही.

SCROLL FOR NEXT