Latest

Ghulam Nabi Azad : काँग्रेस पक्षात पुनरागमन करणार? गुलाम नबी आझाद यांचा मोठा खुलासा

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : काही महिन्यांपूर्वी काँग्रेस पक्षातून बाहेर पडत आझाद पार्टीची स्थापना करणारे गुलाम नबी आझाद पुन्हा एकदा काँग्रेस पक्षात पुनरागमन करणार अशा चर्चा सुरू आहेत. यावर गुलाम नबी आझाद यांनी मोठा खुलासा केला आहे. मी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याच्या काँग्रेस नेत्यांनी अफवा पसरवल्या आहेत, असे आझाद यांनी स्पष्ट केले. (Ghulam Nabi Azad)

गुलाम नबी आझाद यांनी याबाबत एक ट्वीट केले आहे. ट्वीटमध्ये लिहतात, मी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची बातमी एएनआयने दिली आहे, त्याचे मला आश्चर्य वाटले. दुर्दैवाने  काँग्रेस पक्षातील काही नेत्यांकडून अशा बातम्या पसरवण्यात येत आहेत. अशा प्रकारच्या अफवातून माझ्या नेत्यांचे आणि समर्थकांचे मनोबल कमी केले जात आहे. आझाद यांनी याबाबत आणखी एक ट्वीट केले आहे. आझाद म्हणाले, काँग्रेस पक्ष आणि नेतृत्वाबद्दल माझी भावना चांगलीच आहे. (Ghulam Nabi Azad)

गुलाम नबी आझाद काँग्रेस नेत्यांबद्दल काय म्हणाले?

गुलाम नबी आझाद म्हणाले की, मी कोणत्याही काँग्रेस नेत्यासोबत चर्चा केलेली नाही, शिवाय मला कोणत्याही नेत्याकडून फोन आलेला नाही. त्यामुळे माध्यमांनी माझ्या काँग्रेस पक्ष प्रवेशाच्या बातम्या प्रसिद्ध केल्याने मी व्यथित झालो आहे. आझाद पुढे बोलताना म्हणाले, काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये अनिश्चिततेची भावना निर्माण करून त्यांना पक्षात काम करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी हे प्रयत्न करण्यात आले आहेत. (Ghulam Nabi Azad)

भारत जोडो यात्रेत सामील होणार?

भारत जोडो यात्रा पुढील महिन्यात जम्मू काश्मीरमध्ये प्रवेश करणार आहे. यावर भारत जोडो यात्रेत सामील होणार का? असा सवाल गुलाम नबी आझाद यांना विचारण्यात आला होता. याचे उत्तर देताना आझाद म्हणाले, मी याबाबत अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही. माझ्याकडे स्वत:चे खूप काम आहेत. (Ghulam Nabi Azad)

 आझाद यांच्याबद्दल माध्यमांनी कोणता दावा केला होता?

गुलाम नबी आझाद काँग्रेसमध्ये पुनरागमन करणार असल्याचा दावा एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने केला होता. यानंतर आझाद यांच्या पक्षात चर्चांना उधान आले होते. यानंतर आझाद यांनी भारत जोडो यात्रेबाबतही स्पष्टीकरण दिले आहे. (Ghulam Nabi Azad)

हेही वाचंलत का?

SCROLL FOR NEXT