बुलढाणा, पुढारी वृत्तसेवा: जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ येथील प्रसिद्ध भेंडवळ घट मांडणीचे भाकीत शनिवारी (दि. ११) सकाळी जाहीर केले. यामध्ये यंदा भरपूर पाऊस पडणार असल्याचे सांगण्यात आले असून पिकांची परिस्थिती सुद्धा चांगली राहणार असल्याचे भाकीत करण्यात आले आहे. चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज यांनी यंदाची भेंडवळची भविष्यवाणी केली आहे. Buldhana Bhendval News
साडेतीनशे वर्षांची परंपरा लाभलेल्या या भेंडवळ घटमांडणीची भविष्यवाणी शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या पर्जन्यमान आणि पिकांच्या स्थितीवर अंदाज वर्तविते. वाघ कुळातील चंद्रभान महाराज यांनी घटमांडणी व भविष्यवाणीस प्रारंभ केला होता. यामध्ये मुख्यत्वे कृषीविषयक पीके, पर्जन्यमान, देशाचे संरक्षण, अर्थव्यवस्था, व्यापार, आरोग्यविषयक तसेच राजकारण याबाबत संपूर्ण वर्षभराचे भाकीत वर्तविण्यात येते. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर गावालगतच्या पूर्वेकडील वाघ यांच्या शेतात घटाची मांडणी करून दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वी घटाचे सूक्ष्म निरीक्षण करून भाकीत वर्तविण्यात येत असते. भेंडवळ (Buldhana Bhendval News)येथील घटमांडणीचे भाकीत ऐकून शेतकरी येणाऱ्या खरीप व रब्बी हंगामाचे पेरणी, पाण्याचे नियोजन करतात.
अक्षय्य तृतीयेचा मुहूर्तावर घट मांडणी केल्यानंतर आज शनिवारी सूर्योदयापूर्वी वाघ महाराजांनी पीक पाण्याचा अंदाज वर्तविला आहे. मात्र, यावर्षी सध्या आचारसंहिता सुरू असल्याकारणाने राजकीय भाकीत या ठिकाणी वर्तवले गेले नाही.
यंदा तीळ, गहू, मका पीक जास्त, पण पिकावर रोगराई येणार
कपाशी पिक सर्वसाधारण असल्याच भाकित भेंडवळची घटमांडणी येथे सांगण्यात आले आहे. ज्वारी सर्वसाधारण असल्याचे भाकित सांगण्यात आले. तूर सर्वसाधारण मात्र अनिश्चित उत्पादन असल्याचं सांगण्यात येत आहे. मूग आणि उडीद देखील सर्वसाधारण असेल. यंदा तीळ चांगला असेल. एवढंच नव्हे तर पिकांवर रोगराई असेल बाजरी सर्वसाधारण असेल तर साळीचं चांगल पिक असेल, जवस सर्वसाधारण पिक येईल तर वाटाणा देखील सर्वसाधारण आहे. गहू मात्र यंदा भरपूर प्रमाणात असेल, हरभरा चांगल पिक मात्र भाव निश्चित नाही.
सध्या राज्यसह देशांमध्ये लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याकारणामुळे पहिल्यांदाच भेंडवळ घटमांडणी मध्ये राजकीय भाकिते वर्तविण्यात आली नाही. भेंडवळ घट मांडणी दरम्यान आचारसंहितेचे सुद्धा पालन करण्यात आले.
पिके
कापूस… सर्वसाधारण
ज्वारी पिक:-साधारण
भावात चांगले
तूर पिक: -साधारण
मुंग पिक: -चागले
उडीद पिक :-सर्वसाधारण
तील पिक :-चांगले
भादली :-रोगराई जास्त
बाजरी पिक :-साधारण/
तांदूळ पिक:- चांगले/ भावात तेजी
मठ पिक सर्व- साधारण
जवस् पिक:- साधारण /नासाडी
लाख पिक:- साधारण भावत तेजी
वाटाणा पिक:- साधारण
गहू पिक- चांगले /भावात तेजी
हरबरा:-साधारण/भाव कमी पाऊस.
जून कमी
जुलै साधारण
ऑगस्ट चांगला जास्त
सप्टेंबर जास्त व् अवकाळी पाऊस
हेही वाचा