Latest

पोलिसाच्या कानशिलात लगावणं पडलं महागात; आ. सुनील कांबळेंवर गुन्हा दाखल

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा, पुण्यातील ससून रुग्णालयात ५ जानेवारी रोजी राडा झाला होता. यादरम्यान भाजप आमदार सुनील कांबळे यांनी राष्ट्रवादीच्या जितेंद्र सातव यांच्या कानशिलात मारली होती. त्यानंतर उद्घाटन पाटीवर त्यांचं नाव नसल्यानं सुनील कांबळे संतप्त झाल्याचे दिसून आले होते. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात आमदार सुनील कांबळेंनी एका पोलीस कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावली होती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या प्रकरणी आता सुनील कांबळेंच्या अडचणी वाढू शकतात. कारण त्यांच्यावर गुन्हा नोंद झाला आहे.

ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला कानशिलात मारल्याप्रकरणी भाजप आमदार सुनील कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे पोलिसांच्या बंडगार्डन पोलिस ठाण्यात आमदारावर IPC कलम ३५३ (लोकसेवकाला त्याच्या कर्तव्यापासून परावृत्त करण्यासाठी प्राणघातक हल्ला अथवा फौजदारी बळाचा वापर) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं काय घडलं होतं?

पुण्यात अजित पवार यांच्या उपस्थित होणाऱ्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याला भाजपच्या आमदाराने कानशीलात लगावली. ससून रुग्णालयातील तृतीयपंथीयांच्या वार्डचं अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन होणार होतं. या कार्यक्रमाची पत्रिका अथवा बोर्डावर स्थानिक आमदार सुनील कांबळे यांचं नाव नव्हतं. त्यामुळे सुनील कांबळे संतप्त झाले. त्या नंतर त्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन करण्याची जबाबदारी असणाऱ्या जितेंद्र सातव यांच्या कानशीलात लगावली होती. तसेच स्टेजवरून खाली उतरत असताना आमदार सुनील कांबळे यांनी एका पोलीस कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावली होती. आमदार सुनील कांबळे यांनी मात्र आपण कुणालाही मारहाण केली नसल्याचे सांगत सारवासरव केली होती. पण आता त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT