Latest

Germany Shooting : जर्मनीत चर्चमध्ये हल्ला, अंधाधुंध गोळीबार, 7 ठार, 24 पेक्षा जास्त जखमी

backup backup

पुढारी ऑनलाइन डेस्क : Germany Shooting : जर्मनीच्या हैम्बर्ग शहरात एका चर्चमध्ये रविवारी (5 मार्च) अचानक अंधाधुंध फायरिंग करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. रात्री 9.15 च्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत कमीत कमी 7 लोकांचा मृत्यू झाला असून 24 पेक्षा जास्त लोक गंभीर स्वरुपात जखमी झाले आहे.

Germany Shooting : याबाबत पोलिसांनी त्यांच्या ट्विटर हँण्डलवरून माहिती दिली आहे. प्राथमिक माहितीनुसार हा हल्ला ग्रॉसबोरस्टेल जिल्ह्यातील डेलबोएज रस्त्यावरील चर्चमध्ये गोळीबार करण्यात आला. यामध्ये अनेक जण गंभीर स्वरुपात जखमी झाले आहे. तर कमीत कमी सात जणांचा मृत्यू झाला आहे. त्यांनी आपदा चेतावनी अॅपचा उपयोग करून लोकांना अधिक धोक्यापासून सावधान राहण्याचा इशारा दिला आहे.
पोलिसांचे लोकांना घरी राहण्याचे आवाहन

Germany Shooting : जर्मनी पोलिस प्रवक्त्याने याविषयी सांगितले आहे की त्यांनी नागरिकांना घरातून बाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. तसेच अनेक रस्ते बंद करण्यात आले आहे. स्थानिकांना घरातच राहण्याचा सल्ला दिला असून केवळ आवश्यकतेच्या वेळी फोन कॉल्सचा वापर करण्यास सांगितले आहे.

Germany Shooting : तसेच अद्यापही या हल्ल्यापाठीमागील उद्देश काय होता याचा अजूनही तपास लागलेला नाही. दरम्यान पीडितांच्या कुटुंबीयांसाठी संवेदना व्यक्त करत लवकरच या हल्ल्यातील गुन्हेगारांना पकडण्यात येईल, असे म्हटले आहे.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT