Latest

सुरक्षित विवाहासाठी जीनोम सिक्‍वेन्सिंग

backup backup

दोहा : तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की, कतार आणि सौदी अरेबियातील निम्म्याहून अधिक लोक चक्क त्यांच्या नातेवाईकांशी लग्न करतात! संयुक्त अरब अमिरातीमध्ये हे प्रमाण लक्षणीय आहे. यामुळे नातेवाईकांमधील संबंध मजबूत होतात आणि कुटुंबात मालमत्ता टिकून राहते. सनातनी कुटुंबात मुलीला कुटुंबाबाहेर लग्न करण्याची परवानगी नाही. चुलत भाऊ, भाऊ आणि बहीण यांच्यात विवाह होतात. तथापि, कतार किंवा अमिरातीमध्ये कुटुंबाबाहेर लग्न करणार्‍यांची संख्या खूपच मर्यादित आहे.

नातेवाईकांमधील विवाहांमुळे अनेक अनुवंशिक दोष निर्माण होऊ शकतात. त्यामुळेच शरीराची अंतर्गत रचना, पेशी, डीएनए, जनुकांचा पूर्णपणे शोध घेण्यासाठी कतारमध्ये जीनोम प्रोग्राम सुरू करण्यात आला आहे. जीनोम सिक्वेन्सिंगमुळे मनुष्यांमधील आजार आणि इतर शारीरिक दोष शोधता येतात. आतापर्यंत दर दहापैकी एक कतारी व्यक्तीने जीनोम सिक्वेन्सिंग केले गेले आहेत. हे प्रमाण 2026 पर्यंत दर तीनपैकी एक करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सौदी अरेबिया आणि यूएईमध्येही अशाच प्रकारच्या योजना सुरू आहेत.

जगातील पहिल्या मानवी जीनोम प्रकल्पात 2003 मध्ये मानवी डीएनएचा संपूर्ण तपशील तयार करण्यात आला. तेव्हापासून शास्त्रज्ञांनी सुमारे दहा लाख जीनोमचे परीक्षण केले आहे. बहुतेक सिक्वेन्सिंग युरोपियन देशांमध्ये झाले आहे. अनेकदा जवळच्या नातेवाईकाशी विवाह केला तर जनुकांमध्ये बदल होण्याची शक्यता जास्त असते. एखाद्या मुलास पालकांपैकी एकाकडून दोन बदललेले जीन्स वारशाने मिळाले तर तो एखाद्या आजाराला बळी पडू शकतो. या मध्यपूर्व देशांमध्ये काही आजार इतके सामान्य आहेत की डॉक्टर त्यांना एका विशिष्ट जमातीशी किंवा कुटुंबाशी जोडतात.

कतार, कुवैत आणि सौदी अरेबियामध्ये लग्न करणार्‍या जोडप्यांना थॅलेसेमियासारख्या अनुवंशिक आजाराची चाचणी करावी लागते. ज्यांना अशा आजारांची लागण होते ते लग्न करत नाहीत. सध्या कतारमध्ये लवकरच लग्न करणार्‍या जोडप्यांना काही आजारांसाठीच चाचण्या कराव्या लागतात. येत्या दोन वर्षांत शेकडो लोकांची सहज चाचणी केली जाईल, असा विश्वास शास्त्रज्ञांना आहे. सौदी अरेबियामध्येही अशाच प्रकारच्या चाचणीचा विस्तार करण्याची योजना आहे.

SCROLL FOR NEXT