Latest

Gautam Adani : गौतम अदानी बनले जगातील चौथे ‘श्रीमंत’! बिल गेट्स यांना टाकले मागे

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी (Gautam Adani) यांनी मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांना मागे टाकत जगातील चौथ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. फोर्ब्सच्या श्रीमंत व्यक्तींच्या यादीनुसार, अदानी यांची संपत्ती 9.2 लाख कोटी रुपये (115.4 अब्ज डॉलर) झाली असून गेट्स यांची एकूण संपत्ती सुमारे 8.3 लाख कोटी रुपये (104.2 अब्ज डॉलर) आहे. म्हणजेच दोघांच्या एकूण संपत्तीमध्ये सुमारे 11 अब्ज डॉलरचा फरक आहे.

अदानी हे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

अदानी (Gautam Adani) समूहाच्या शेअर्सच्या किमतीत झपाट्याने वाढ झाल्यामुळे ते चौथ्या क्रमांकावर पोहोचले आहेत. ते या वर्षी 4 एप्रिल रोजी 100 अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील झाले होते. अदानी हे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती देखील आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी फोर्ब्सच्या यादीत 10 व्या क्रमांकावर आहेत. बिझनेस टायकून अदानी यांच्या पुढे आता तीन श्रीमंत व्यक्ती आहेत. यात टेस्लाचे संस्थापक एलोन मस्क, लुई व्हिटॉनचे सीईओ बर्नार्ड बर्नार्ड अर्नाल्ट आणि अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांचा समावेश आहे.

बिल गेट्स यांनी गेल्या आठवड्यात त्यांच्या संपत्तीतून 20 अब्ज डॉलर गेट्स फाऊंडेशनला दान केले होते. या देणगीनंतर बिल गेट्स यांच्या क्रमवारीत घसरण झाली आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत ते चौथ्या स्थानावरून पाचव्या स्थानावर आले. गेट्स यांच्या देणगीचा फायदा गौतम अदानी यांना झाला आणि ते चौथ्या स्थानावर पोहोचले.

एका वर्षात अदानीची एकूण संपत्ती दुप्पट

2021 च्या सुरुवातीच्या तुलनेत भारतीय उद्योगपतीच्या संपत्तीत दुपटीने वाढ झाली आहे. आता ही संपत्ती वाढून 112.9 अब्ज डॉलर झाली आहे. अदानी यांचा व्यवसाय बेसिक इन्फ्रा, इलेक्ट्रिसिटी, ग्रीन एनर्जी, गॅस, पोर्ट्सपर्यंत पसरलेला आहे. त्यांना हरित ऊर्जेचे जगातील सर्वात मोठे उत्पादक बनायचे आहे आणि ते अक्षय ऊर्जा प्रकल्पांवर 70 अब्ज डॉलर्स पर्यंत गुंतवणूक करणार आहेत. यासह, अदानी आता 115.6 अब्ज डॉलर्सच्या एकूण संपत्तीसह भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT