Latest

Gangubai Kathiawadi : गंगुबाईचा बोलबाला

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'गंगुबाई काठियावाडी'चा (Gangubai Kathiawadi) ट्रेलर शुक्रवारी आला आणि 'गंगुबाई छा गई..' अशाच प्रतिक्रिया सर्वत्र उमटल्या. यू ट्यूबवर या ट्रेलरला पहिल्या तीन तासांतच 25 लाख लाईक्स आणि 11 हजार कॉमेंटस् होत्या. ट्रेलर दमदार असून आलिया भट्टसह (Gangubai Kathiawadi) अजय देवगण, विजय राज, जिम सरभ अशी तगडी स्टारकास्ट यात दिसून येते. या भूमिकेने आलियाच्या करिअरचा नवा अध्याय सुरू होणार असे दिसते. अजय देवगणने या चित्रपटात मुंबईतील एकेकाळचा डॉन करीम लालाची भूमिका साकारली आहे.

करीम लाला याला गंगुबाई भाऊ मानून राखी बांधत होती, असे सांगितले जाते. दोनच दिवसांपूर्वी आलिया आणि अजय देवगणच्या लूकचे नवे पोस्टर रीलिज करण्यात आले होते, त्यालाही नेटकर्‍यांनी मोठा प्रतिसाद दिला होता. 25 फेब्रुवारीला चित्रपट प्रदर्शित होत आहे. पत्रकार एस. हुसैन झैदी यांच्या 'माफिया क्‍वीन ऑफ मुंबई' या पुस्तकावर हा चित्रपट आधारित आहे.

SCROLL FOR NEXT