Latest

लॉरेन्स बिष्णोई टोळीचे पुणे कनेक्शन? खा. संजय राऊत धमकी प्रकरणात एकजण ताब्यात

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पंजाबमधील लॉरेन्स बिष्णोई टोळीचे पुणे कनेक्शन पुन्हा एकदा समोर आले आहे. खासदार संजय राऊत यांना लॉरेन्स बिष्णोई या कुख्यात टोळीच्या नावाने धमकीचा संदेश आला होता. याप्रकरणात पुणे गुन्हे शाखेने एका संशयित आरोपीस ताब्यात घेऊन, मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले. राहुल तळेकर रा. वडगाव शेरी असे संशयित आरोपीचे नाव आहे. अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी शनिवारी दिली.

खासदार राऊत यांना पंजाब, हरियाणामध्ये दहशत असलेल्या लॉरेन्स बिष्णोई टोळीकडून जीवे मारण्याचा धमकीचा संदेश पाठविण्यात आला होता. या प्रकरणात पोलिसांनी तपास सुरू केला होता. त्यासोबतच राऊत यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. मुंबई पोलिसांना तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे काही धागेदोरे मिळाले होते. त्यानुसार एक संशयित पुण्यात असल्याची माहिती त्यांनी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला दिली होती.

त्यानुसार पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने, संबंधित आरोपीचा तपास करत खराडी चंदननगर परिसरातून एका हॉटेल मधून राहुल तळेकर याला ताब्यात घेतले आहे. तळेकर हा एका हॉटेलमध्ये काम करत आहे. त्याने अशाप्रकारचे कृत्य कशासाठी केले आहे, तसेच त्याचा लॉरेन्स बिष्णोई टोळीशी नेमका काय संबंध आहे, याबाबतचा तपास पोलीस करत आहे. पुणे पोलिसांनी पुढील तपासासाठी त्याचा ताबा मुंबई पोलिसांना दिल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT