Latest

कुरुंदवाडमधील गणेशोत्सव हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक; मशिदींमध्ये गणपतीची प्रतिष्ठापना

backup backup

पुढारी वृत्तसेवा : कुरुंदवाड येथील हिंदू-मुस्लिम ऐक्याची प्रतीक असणाऱ्या पाच मशिदीत गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते. गेल्या चार दशकापासूनची परंपरा मुस्लिम समाज बांधवांनी आजही जोपासली आहे. राज्यात-देशात प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी ही मशिदीत गणपतीची प्रतिष्ठापना करून हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश दिला आहे.

कुरुंदवाड शहरातील कुडेखान बडेनाल साहेब मशीद, ढेपणपुर मशीद, बैरागदार मशीद, शेळके मशीद आणि कारखाना मशिदीत गणपतीची प्रतिष्ठापना करून मनोभावे मुस्लिम समाज बांधव गणरायाची सेवा करत आहेत. येथील कै.गुलाब गरगरे, कै.उस्मान दबासे कै. दिलावर बारगीर, कै. मौला जमादार, कै. वली पैलवान, कै. रमजान घोरी यांच्यासह मुस्लिम समाज बांधवांनी 4 दशकांपूर्वी 1986 साली एकत्रित गणपती आणि पीरांची या पाच मशिदीत पारंपारिक पद्धतीने प्रतिष्ठापना करून धार्मिक एकात्मतेच्या परंपरेला सुरवात केली. ती परंपरा आजही अबाधित आहे. त्यांच्या वारसांनी व हिंदू-मुस्लिम समाजबांधवांनी सुरू ही परंपरा सुरु ठेवली आहे.

गणेशोत्सवाच्या काळात मशिदीत गणपतीची प्रतिष्ठापना करून मनोभावे मुस्लिम समाज गणपतीची पूजाअर्चा करत असतात 36 वर्षानंतर सन 2018 सालापासून पुन्हा एकदा गणपती आणि मोहरम हे दोन्ही सण एकत्रित साजरा करण्याची पर्वणी आली होती.2020 सालापर्यंत 3 वर्षे मशिदीत पीर आणि गणपतीची एकत्रित प्रतिष्ठापना करून समस्त हिंदू मुस्लिम समाज बांधवांनी पुजाआर्चा करत भक्तिमय वातावरणात हे सण पार पाडले.

कुरुंदवाड शहर हे राष्ट्रीय एकात्मतेचे आणि हिंदू-मुस्लीम ऐक्याचं दर्शन घडवणारं शहर आहे. हे प्रेम एकतर्फी नसुन मोहरमात हिंदू बांधव पिराला मोदकांचा नैवद्य दाखवून तर गणेशोत्सवामध्ये गणपतीला मुस्लीम समाजबांधव रोठांचा व मलिद्याचा नैवैद्य दाखवून भक्तिभावाने उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून सण साजरा करत असतात.

राज्यात अनेक वेळा जातीय दंगली उसळल्या असताना मात्र त्याचा शहरातील हिंदू-मुस्लीम ऐक्यावर कधीच परिणाम झाला नाही.तर कुरुंदवाडकरांनी शहरातील मशिदीतील गणपतीच्या प्रतिष्ठापनेचा आदर्श इतरांनीही घ्यावा असा संदेश दिला होता.कुरुंदवाड या ऐतिहासिक नगरीत सर्वधर्मीयांची एकात्मतेची विन आजही अखंडितपणे घट्ट आहे.

घरी पाव्हणा आल्याचा आनंद : रफिक दबासे

मशिदीत गणपतीची प्रतिष्ठापना करत असताना आमच्या घरी आमचा लाडका पाव्हणा घरी आल्याचा आनंद होतो. आमच्या पूर्वजांनी सुरू केलेली परंपरा आम्हाला पार पाडायला मिळत आहे हे आमचे भाग्य आहे. गणरायाच्या माध्यमातून मशिदीत आम्ही बहुजन समाज बांधव एकत्रित येतो आणि आमची मैत्री आणखीन दृढ होते.रफिक उस्मान दबासे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT