पुढारी ऑनलाईन : संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंनदाचे, जल्लोषाचे वातावरण आहे कारण एकच आपल्या सगळ्यांचाच लाडका गणपती बाप्पा याचे लवकरच आगमन होणार आहे. सगळीकडे गणेशाच्या आगमनाची चाहूल लागली असतानाच कलर्स मराठीवरील प्रेक्षकांच्या लाडक्या मालिकांमध्ये देखील गणरायाचे आगमन आगमन होणार आहे.
गणेशाच्या आगमनाने सगळी संकंट दूर होऊन जाऊ दे, हेचं मागण यंदा गणरायापुढे असणार आहे. 'रमा- राघव' मालिकेत गणरायाच्या आगमनाची जय्यत तयारी सुरु होत आहे. तर, विघ्नहर्त्याच्या आशीर्वादाने कावेरी आणि राज मोहिते परिवारावर आलेलं संकट दूर करणार आहेत. तर, 'पिरतीचा वनवा उरी पेटला' मालिकेत सावीवर ओढवलेल्या संकटातून बाप्पा तिचे रक्षण कसे करणार? हे बघायला मिळणार आहे. यासोबत 'भाग्य दिले तू मला' आणि 'काव्यांजली' मालिकेचा गणेशचतुर्थी विशेष हे भाग पाहायला मिळणार आहे.
संस्कार वर्गासाठी एक महिना घरी राहून गेलेली रमा, आपला मुलगा राघवच्या प्रेमात पडल्याचे गजानन गुरुजींना कळते, यानंतर ते रमा राघवच्या नात्याला परवानगी देतील का?, या उत्कंठा टप्प्यावर रमा- राघव ही मालिका आहे. शालिनीची परवानगी घेऊन गणपतीच्या तयारीसाठी रमा पुन्हा पुरोहित घरी राहायला आली आहे. रमाने स्वत: बनविलेल्या मखरात गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत, तेव्हा बाप्पाच्या आशीर्वादाने हे प्रेमाचे नाते पुरोहित कुटुंबाने स्वीकारते का? हे पाहण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
बाप्पाच्या आगमानाची वाट दरवर्षी आपण सगळेच अगदी त्याला निरोप दिल्यापासून बघत असतो. तो कधीच आपल्याला सोडून जाऊ नये अशी आपली इच्छा असते. म्हणून आपण म्हणतो, पुढच्या वर्षी लवकर या!. आता सगळीकडेच बाप्पाच्या आगमनाची तयारी मोठ्या उत्साहात, थाटामाटात सुरू आहे. आतुरतेने सगळेच श्री गणेश आगमनाची वाट बघत आहेत. सजावटीची तयारी, रोषणाई, बाप्पासाठी गोडधोड पदार्थ सगळ्याची तयारी सुरु झाली आहे. कलर्स मराठीवरील मालिकांमध्ये गणरायाचे धुमधडाक्यात आगमन होणार आहे.
हेही वाचा :