Latest

Gadar 2 New Song : तुम्ही पुन्हा थिरकणार, ‘मैं निकला गड्डी लेके’ रिलीज (Video)

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : सनी देओल – अमीषा पटेलचा अपकमिंग चित्रपट 'गदर २' चांगलाच चर्चेत आलाय. 'उड जा काले कावा' रीप्राइज्ड व्हर्जन गाणे रिलीज होऊन प्रेक्षकांची मने जिंकली. (Gadar 2 New Song) आता निर्मात्यांनी 'मैं निकला गड्डी लेके' नवे व्हर्जन रिलीज करण्यात आले. मुळचे गाणे एक चार्टबस्टर होतं. नवं व्हर्जनदेखील सुंदर आहे. गाणे रिलीज होताच यूट्यूबवर धुमाकूळ घालत आहे. (Gadar 2 New Song)

'मैं निकला गड्डी लेके' गाणे रिलीज

गाण्याची सुरुवात उत्कर्षच्या भूमिकेने होते. तो 'जीते' च्या भूमिकेत आहे. वडील तारा सिंहकडे मोटरसायकलीची मागणी करतो. अमीषा पटेल (सकीना) मुलाची बाजू घेतना दिसते. व्हिडिओमध्ये सनी-अमीषा यांच्यात एक रोमँटिक सीक्वेन्सदेखील दाखवण्यात आला आहे.

'मैं निकला गड्डी लेके' मध्ये ओरिजनल चार्म

'मैं निकला गड्डी लेके'च्या नव्या व्हर्जनमध्ये ओरिजनल चार्म कायम आहे. यावेळी उदित नारायण यांच्यासोबत त्यांचा मुलगा आदित्य नारायणने सनी देओल आणि उत्कर्ष शर्मावर चित्रित करण्यात आलेल्या गाण्याला आपला आवाज दिलाय. शबीना खानने कोरिओग्राफ केला आहे. अनिल शर्मा दिग्दर्शित चित्रपट 'गदर २' अकरा ऑगस्टला धुमाकूळ घालणार आहे.

SCROLL FOR NEXT