Latest

G20 Delegates : G20 बैठकीत देश-विदेशातील प्रतिनिधींनी लुटला नाटू-नाटू गाण्यावर नृत्याचा आनंद; पाहा व्हिडिओ

backup backup

पुढारी ऑनलाइन डेस्क : G20 Delegates : G20 बैठकीसाठी आलेल्या देश-विदेशातील प्रतिनिधींनी RRR चित्रपटातील नाटू-नाटू गाण्यावर नाचण्याचा आनंद लुटला. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. भारताच्या G20 अध्यक्षतेखालील कृषी कार्यकारी गटाची दुसरी कृषी प्रतिनिधी बैठक (ADM) काल चंदीगडमध्ये सुरू झाली. या बैठकीसाठी G20 तील सदस्य राष्ट्रांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी या डेलिगेट्सनी चंदीगडमधील पारंपारिक सांस्कृतिक कलाकारांसोबत नाटू-नाटू गाण्यावर नृत्याचा आनंद घेतला.

G20 बैठकीसाठी आलेल्या विदेशी पाहुण्यांना देखील ऑस्कर पुरस्कार विजेता नाटू-नाटू गाण्यावर नाचण्याचा मोह आवरला नाही. सर्व विदेशी पाहुण्यांनी या गाण्यावर चांगलाच ताल धरला. G20 बैठकीनिमित्त सध्या हरियाणा आणि चंदीगढमध्ये विदेशी प्रतिनिधी उपस्थित राहणार आहे. प्रतिनिधींसाठी खास सांस्कृतिक कार्यक्रमांची महफिल आणि रात्री भोज चे आयोजन केले आहे.

G20 Delegates : शुक्रवारी रंगणार खास कार्यक्रम

G20 बैठकीसाठी आलेल्या विदेशी प्रतिनिधींसाठी हरियाणा सरकारकडून शुक्रवारी एका खास कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम पिंजौर येथील यादविंद्रा गार्डन येथे होणार आहे. यावेळी विभिन्न देशातील तब्बल 180 प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यासाठी ऐतिहासिक सांस्कृतिक कार्यक्रम आणि रात्री भोज आयोजित करण्यात आला आहे.

प्रतिनिधींसाठी आयोजति कार्यक्रमासाठी गार्डनच्या 7 टैरेसला रंग-बिरंगी लाइट सहित फूलांनी सजवले आहे. गार्डनच्या भिंतींना आकर्षक पेंट लावून त्यांना चमकवण्यात आले आहे. याशिवाय गार्डनमध्ये रंग-बिरंगी कारंजे लाइट्समधून निघणारे पानी इत्यादी सोयी सुविधा केल्या आहेत.

G20 Delegates : ऑस्कर विजेते RRR चित्रपटातील नाटू-नाटू गाणे

RRR चित्रपटातील नाटू-नाटू गाण्याला नुकताच ओरिजनल सॉंग म्हणून ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. ऑस्कर सोहळ्यापूर्वी गोल्डन ग्लोब पुरस्कार आणि अन्य पुरस्कार ही या गाण्याला मिळाले आहे. हे गाणे देशासहच विदेशातही तुफान गाजले.

हे ही वाचा :

SCROLL FOR NEXT