Latest

फुरसुंगी, उरुळी देवाची स्वतंत्र नगरपरिषदेबाबत हरकतींचा पाऊस

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : फुरसुंगी, उरुळी देवाची ही गावे पालिकेतून वगळून या दोन गावांसाठी स्वतंत्र नगरपरिषद स्थापन करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. याबाबत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिसूचनेवर जिल्हा प्रशासनाकडे गेल्या तीन दिवसांत हरकती-सूचनांचा पाऊस झाला आहे. अवघ्या तीन दिवसांत सुमारे 2800 हरकती-सूचना प्राप्त झाल्या आहेत. शनिवारी आणि रविवारी ई-मेलवरून हरकती-सूचना स्वीकारल्या जाणार आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

हरकती-सूचना नागरिकांना 30 एप्रिलपर्यंत दाखल करता येणार आहेत. मात्र, शनिवारी आणि रविवारी सुटी असल्याने हरकती-सूचना र्विेिीपश01 ऽसारळश्र. लेा या मेलवर पाठविल्यास त्या स्वीकारल्या जाणार आहेत. प्राप्त हरकतींवर सुनावणी होऊन त्याचा अभिप्राय पुढील एक महिन्यात राज्य शासनाकडे पाठविला जाईल. त्यानंतर शासनस्तरावरून पुढील कार्यवाही केली जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नगरपालिका शाखेचे सहआयुक्त व्यंकटेश दुर्वास यांनी दिली.

जिल्हा प्रशासनाकडे आलेल्या हरकतींवर जिल्हाधिकारी सुनावणी घेऊन त्याचा अहवाल शासनाला सादर करणार आहेत. राज्य शासनाकडून या अहवालावर विचार करून फुरसुंगी, उरुळी देवाची नगरपरिषद स्थापन करण्याबाबतची अंतिम अधिसूचना प्रसिद्ध केली जाणार आहे. या प्रक्रियेनंतर फुरसुंगी, उरुळी देवाची नगरपरिषद स्थापन होण्यावर शिक्कामोर्तब होणार आहे.

  • फुरसुंगी, उरुळी देवाची नगरपालिका
  • मेलवरून स्वीकारल्या जाणार सूचना-हरकती
SCROLL FOR NEXT