Latest

Mobile Selfie : अटल सेतूवर सेल्फीचा मोह आवरेना!, 11 लाखांचा दंड वसूल

अनुराधा कोरवी

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : गेल्या महिन्यात उद्घाटन झालेल्या मुंबई ट्रान्स हार्बर लिंकवरुन (अटल सेतू) प्रवास करताना सेल्फी फोटो घेण्यास बंदी असली तरी अनेक प्रवाशी ही बंदी उधळून लावत आहेत. यामुळे या सेतूवर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर दंडात्मक कारवाई केली जात असून, गेल्या महिनाभरात एक हजार 387 वाहनांवर कारवाई करण्यात आली. अटल सेतूवर मध्येच गाड्या थांबवून सेल्फी काढणार्‍यहा या प्रवाशांकडून वाहतूक पोलिसांनी 10 लाख 99 हजार 66 रुपयांचा दंड वसूल केला आहे. ( Mobile Selfie )

संबंधित बातम्या 

मुंबई-नवी मुंबईतील अंतर कमी करण्यासाठी अटल सेतू उभारण्यात आला. शुक्रवारी 12 जानेवारीला अटल सेतूचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यानंतर या पुलावर दुचाकी व तीनचाकी वाहनास प्रवेश बंदी आहे. तसेच चारचाकी वाहनांसाठी वेगमर्यादा 100 किमी प्रतितास आहे. या पुलावर विनाकारण थांबण्यास व वाहन उभे करण्यास मनाई आहे. तरीही अनेक वाहनचालक वाहने सेतूवर उभी करून वाहनातून खाली उतरून सेल्फी व फोटो काढत असल्याचे आढळत आहे.

अटल सेतूच्या 10 किमी हद्दीच्या वाहतूक नियमनाची जबाबदारी मुंबई पोलिसांवर तर उर्वरित भागाची जबाबदारी नवी मुंबई पोलिसांकडे आहे. शनिवार आणि रविवार अटल सेतू पाहण्यासाठी येणार्‍यांची संख्या जास्त होती. दिवसाला सुमारे 30 ते 35 हजार वाहने अटल सेतूवरुन प्रवास करतात. ( Mobile Selfie )

SCROLL FOR NEXT