Latest

French Open 2022 : नोव्हाक जोकोविच फ्रेंच ओपनमधून बाहेर, राफेल नदालची सेमीफायनलमध्‍ये धडक

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क :

जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेला टेनिसपटू नोव्हाक जोकोविच फ्रेंच ओपन ग्रँडस्‍लॅम स्‍पर्धेच्‍या ( French Open 2022 ) उपांत्‍यपूर्व फेरीत पराभूत झाला. १३ वेळा फ्रेंच ओपन ग्रँडस्‍लॅमवर आपली मोहर उमटविणार्‍या राफेल नदालने या स्‍पर्धेतील जोकोविच याचे आव्‍हान संपुष्‍टात आणत दिमाखात सेमीफायनलमध्‍ये धडक मारली. नदालने गतविजेत्‍या जोकोविचचा ६-२, ४-६, ६-२, ७-६ (७-४) असा पराभव केला. आता ३ जून रोजी उपांत्‍य फेरीत त्‍याचा सामना तिसर्‍या मानांकित अलेक़्‍झांडर ज्‍वरेव्‍ह याच्‍याशी होईल.

फ्रेंच ओपनमध्‍ये उपांत्‍यपूर्व फेरीतच टेनिसमधील दिग्‍गज खेळाडू आमने-सामने आले. त्‍यामुळे हा सामना अंतिम सामन्‍यासारखा मानला गेला. गतविजेता जोकोविच याच्‍यासमोर तब्‍बल १३ वेळा फ्रेंच ओपन ग्रँडस्‍लॅम जिंकणार्‍या नदलाचे आव्‍हान होते. टेनिसमधील हे ग्रँडस्‍लॅम लाल मातीत (क्‍ले काेर्ट) खेळले जाते. अपेक्षेप्रमाणे लाल मातीचा बादशहा अशी ओळख असणार्‍या नदालने आपल्‍या नावला साजेसा खेळ केला.

French Open 2022 : नदाल हाच लाल मातीवरील बादशहा

नदालने उत्‍कृष्‍ट खेळी करत पहिल्‍याच सेट ६-२ असा आपल्‍या नावावर केला. मात्र जोकोविच याने कमबॅक करत दुसर्‍या सेट ६-४ असा जिंकला. आता सामना अटीतटीचा होईल, असा सर्वांचा अंदाज होतातच मात्र नदलाने ६-२, ७-६ (७-४) असे सलग दोन सेट जिंकत आपणच लाल मातीवरील बादशहा आहोत, हे पुन्‍हा एकदा सिद्‍ध केले.

नदालने फ्रेंच ओपनही ग्रँडस्‍लॅम स्‍पर्धा १३ वेळा जिंकली आहे. अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिला टेनिसपटू ठरला आहे. ग्रँडस्‍लॅम जिंकण्‍यातही जोकोविच आणि नदाल यांच्‍यात तीव्र स्‍पर्धा आहे. जोकोविच याने आतापर्यंत २० ग्रँडस्‍लॅम जिंकले आहेत. तर ३५ वर्षीय नदालने २१ ग्रँडस्‍लॅम जिंकत नवा विक्रम प्रस्‍थापित केला आहे. फ्रेंच ओपन स्‍पर्धेत त्‍याने १५ वेळा उपांत्‍य फेरीत प्रवेश केला आहे. आता दोन सामने जिंकले की. २२ वे ग्रँडस्‍लॅम आपल्‍या नावावर करत नवा विक्रम  करण्‍याची संधी त्‍याला आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT