Latest

Delhi Murder Case : व्यसनाने केले कुटुंब उद्ध्वस्त : दिल्लीत एकाच कुटुंबातील चौघांची हत्या

अविनाश सुतार

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : व्यसनाधीन तरुणाने त्याच्याच कुटुंबातील चौघांची हत्या (Delhi Murder Case) केल्याची धक्कादायक घटना राजधानी दिल्लीतील पालम परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणात पोलिसांनी आरोपी केशवला (वय २५) अटक केली आहे. व्यसनासाठी पैसे न दिल्याच्या रागातून आरोपीने त्याचे वडील दिनेश (वय ५०), आई दर्शना, बहिण उर्वशी ( वय१८) तसेच आजी दीवाना देवीची (वय ७५) धारदार शस्त्राने हत्या केली.

पोलिसांकडून (Delhi Murder Case) मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार आरोपी व्यसनाधीन होता. त्याचे व्यसन सोडवण्यासाठी कुटुंबियांनी त्याला व्यसनमुक्ती केंद्रात दाखल केले होते. काही दिवसांपूर्वीच कुटुंबियांनी त्याला घरी आणले होते. परंतु, व्यसनमुक्ती केंद्रात देखील त्याचे व्यसन सुटले नव्हते. व्यसन करण्यासाठी तो कुटुंबियांच्या मागे पैशांचा तगादा लावायचा.

मंगळवारी देखील त्याने व्यसनासाठी कुटुंबियांकडे पैसे मागितले. परंतु, घरच्यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने केशवने त्यांची हत्या करण्याचा निर्णय घेतला. घरातील चारही सदस्यांना वेगवेगळ्या खोलीत घेवून जात त्याने त्यांची हत्या केली. हत्येनंतर पसार होण्याच्या तयारीत असताना आरोपीला इतर लोकांच्या मदतीने त्याच्या चुलत भावाने पकडले.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार रात्री साडे दहाच्या सुमारास केशवच्या घरातून भांडणाचा आवाज येत होता. काही वेळानंतर केशवच्या चुलत भावाने बहिणीच्या ओरडण्याचा आवाज ऐकला. यानंतर तो आजूबाजूच्या लोकांना घेवून घरी पोहचला. परंतु, आरोपीने दरवाजा आतून बंद केला होता. यावेळी घराचे दार ठोठावल्यानंतर केशवने हे घरघुती भांडण असल्याचे सांगितले.

लोकांनी त्यामुळे काही वेळ वाट बघितली. परंतु, अचानक आरोपी पळू लागला, तेव्हा लोकांनी त्याला पकडले. लोकांनी जेव्हा घरी जाऊन बघितले. तेव्हा घराची फरशी रक्ताने माखली होती. आजूबाजूला चार मृतदेह पडले होते. आरोपी केशव गुरुग्राम मधील एका कंपनीत कामाला होता. एक महिन्यापूर्वीच त्याने नोकरी सोडली होती. नोकरी सोडल्यानंतरच तो घरच्यांकडे व्यसनासाठी पैशांचा तगादा लावत होता. व्यसनाधीन मुलाने व्यसनाच्या आहारी जात अवघे कुटुंब संपवल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

हेही वाचलंत का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT